Type Here to Get Search Results !

जनता विद्यालय परिसरात अतिक्रमणाचा विळखा

 

जनता विद्यालय परिसरात अतिक्रमणाचा विळखापालकांचा अंदोलनाचा इशारा



धाराशिव स्टार न्यूज-वृतसेवा 

येडशी प्रतिनिधी-संतोष खुने(दि.१ऑगस्ट२०२५)

येडशी येथील जनता विद्यालय परिसरातील अतिक्रमण व डिजीटल बॅनर लावू नये यासाठी पालक ग्रामस्थांची बैठक घेण्यात आली. 

गुरुवारी सकाळी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. जनता विद्यालयाच्या परिसरात संरक्षक भिंती लगत काही नागरिक अतिक्रमण करून दुकाने व गाळे तयार करत आहेत तसेच सतत शाळेच्या गेट व परिसरात वाढदिवस व्यावसाईक व इतर डिजिटल लावले जात असून यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे त्याचबरोबर शाळेच्या परिसरात विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉल्बी मोठ्या आवाजात वाजवल्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर ती दुष्परिणाम होत असून  अतिक्रमणे काढुण टाकण्यासाठी शिवाजी शिक्षण संस्था बार्शी ,

जनता विद्यालय,पालक ,शिक्षक यांच्या बैठकीत  अतिक्रमण निघेपर्यंत  आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

   यावेळी मुख्याध्यापक चंद्रकांत नलावडे,शाळा समीतीचे  उपअध्यक्ष राजाभाऊ शेख ,महिला अध्यक्ष कोमल क्षीरसागर, उर्मीला घोळवे,अशोक देशमुख,सतीश नलावडे,संतोश डुमणे,प्रकाश सोनार,विजय पवार व पालक उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments