कळंब शहरात शेकडो मुस्लिम बांधवांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
कळंब प्रतिनिधी :
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्री. शिवाजी आप्पा कापसे व शिवसेना नेते श्री. अजित दादा पिंगळे यांच्या नेतृत्वाखाली कळंब शहरातील शेकडो मुस्लिम बांधवांनी आज मोठ्या उत्साहात शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख मा. एकनाथजी शिंदे साहेब व पालकमंत्री मा. प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या विकासाच्या राजकारणावर विश्वास ठेवत हा मोठा पक्षप्रवेश झाला आहे.
आगामी नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा प्रवेश अत्यंत महत्वपूर्ण मानला जात आहे.
यावेळी सभापती शिवाजी आप्पा कापसे यांनी सांगितले की, “कळंब शहरातील मूलभूत समस्या, स्थानिक रोजगार निर्मिती, तसेच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही शिवसेना पक्षाच्या माध्यमातून ताकदीने काम करणार आहोत.”
शिवसेना नेते अजित दादा पिंगळे यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना उद्देशून सांगितले की, “आपण सर्वांनी एकजुटीने काम करून शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदासह सर्व नगरसेवक विजयी करावेत. शिवसेना म्हणजे विकास, कामगिरी आणि जनतेचा विश्वास.”
या पक्षप्रवेश सोहळ्यात सौ. नाजनीम सलीम बागवान,
आबू बागवान, अलीम बागवान, जुनेद बागवान, आर्श बागवान, अजीम बागवान, रतन बागवान, सादेक बागवान, लारेब बागवान, शाहबाज बागवान, शोएब बागवान, अरहान बागवान, आफताब बागवान, आदिल बागवान, तालेब बागवान, बबलू बागवान, बिट्टू बागवान, दानिश बागवान, सोफियान बागवान, आबेद बागवान, बिलाल बागवान, सलीम बागवान, साकिब बागवान, नोमान पठाण, रौफ बागवान, सादिक बार्शीकर, गुल्लू बागवान, अब्बास बागवान, उमर बागवान, उमर महेबुब बागवान, अब्बास मेहबूब बागवान, रेहान रतन बागवान, जफर सादेक बागवान, इमरान मेहबूब बागवान
यांच्यासह शेकडो मुस्लिम युवकांनी शिवसेनेत प्रवेश करून “विकासाच्या वाटेवर चालणाऱ्या शिवसेनेचा झेंडा उंचावण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी तालुकाप्रमुख लक्ष्मीकांत हुलजुते, मुस्ताक भाई कुरेशी, अतुल भैया कवडे सुरेश भैया शिंदे,मा. नगरसेवक तथा संचालक रोहण पारख,डिकसळ ग्रा. स. इम्रान भाई मुल्ला अमर बाबू चाऊस, बापू कदम सचिन शिंगारे समीर सय्यद,तसेच अनेक पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments