सारा गाव मामाचा..भाच्चा आहे कामाचा -मला मतदान करा -प्रा.तुषार वाघमारे.
...............................................................................
दहिफळ प्रतिनिधी-कळंब तालुक्यातील दहिफळ येथे निवडणुकीची चांगलीच रणधुमाळी सुरू आहे.सध्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा प्रचार जोमात सुरु आहे.मोहा गटातुन घड्याळ,मशाल,तुतारी ,कमळ- धनुष्यबाणाकडुन अनेक उमेदवार एकमेकांच्या
समोर निवडणुक लढत आहेत.पक्षावर नाराज होत अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत.
सध्या दहिफळ गाव प्रचाराचा केंद्रबिंदु असुन दररोज सभा प्रचार सुरु आहेत.
गौर गणातुन तुषार वाघमारे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी पक्षाकडुन तुतारी चिन्ह घेऊन निवडणुक लढत आहेत.
दहिफळ त्यांचे आजोळ असुन बालपण दहिफळ गावात गेले आहे.प्राथमिक शिक्षण जि प प्राथमिक शाळा दहिफळ येथे झाले आहे.प्रत्येक गल्लीतील व्यक्तींची ओळख आहे.
मामा,दाजी,भाच्चा असा नातेगात्यांचा गोतवळा आहे.
प्रचाराचा नारळ खंडोबा मंदिरात फोडला.यावेळी राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष डाॅ.प्रताप भैय्या पाटील,काॅंग्रेसचे जेष्ठनेते अशोक भातलवंडे,राष्ट्रवादी पक्षाच्या महिला तालुकाध्यक्षा स्वाती भातलवंडे,वसंत धोंगडे,वसंत भातलवंडे,नारायण भातलवंडे,सुधीर मते,तानाजी मते,रामचंद्र मते,बामळगावच्या सरपंच सुजाता वाघमारे,उमेदवार तुषार वाघमारे सह शेकडो कार्यकर्ते उपस्थीत होते.
प्रचार सभेत अशोक भातलवंडे यांनी आपली भुमिका मांडली.दहिफळचा भाच्चा म्हणुन तरुण अभ्यासु उमेदवार तुषार वाघमारे यांना निवडुन आनण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न करणार असा शब्द दिला.वसंत धोंगडे यांनी आम्ही सदैव सोबत असल्याचे सांगितले.तर उमेदवार म्हणुन बोलत असताना.सारा गाव मामाचा आहे.भाच्चा म्हणुन सगळ्यांनी मतदानाच्या माध्यमातुन आशिर्वाद द्यावा.हा भाच्चा कुठलेही काम असुद्या काम पुर्ण करणार.
पहिल्यादांच मत मागण्यासाठी आलोय.सर्वांनी संधी द्यावी असे अहवान केले.
राष्ट्रवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रतापभैय्या पाटील म्हणाले की,प्रा.तुषार वाघमारे यांनी राष्ट्रवादी पक्षाच्या विचाराला धरून अनेक सामाजिक कामे केली.कोरोणा काळात गरजूंना किट वाटप केले.रुग्णांना औषधे पुरवली,एवढच नाही तर पुरग्रस्थांना मत पोहच केली.समाजाप्रति धडपडण्याची जिद्द,शेतकरी,शेतमजुर,विद्यार्थी ,सुशिक्षीत बेरोजगारासाठी संकटकाळी धाऊन जाण्याची वृत्ती यामुळे उमेदवार कसा असावा याचा विचार करुन मतदारांनी योग्य निर्णय घ्यावा.पाच वर्षाचा विचार करुन तुमच्या हक्काचा माणुस निवडणुन द्या.विकास होणार याची मी ग्वाही देतो असे पाटील म्हणाले.यावेळी गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments