लिटल स्टार इंटरनॅशनल स्कूलच्या तीन विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीसाठी निवड
केंद्रप्रमुख जगताप यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार
येडशी प्रतिनिधी : येडशी येथील लिटल स्टार इंटरनॅशनल स्कूलच्या सन २०२५-२६ मधील तीन विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन केले. याबद्दल शाळेच्या वतीने या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांमध्ये इयत्ता चौथीतील भोसले अक्षरा रंजीत, इयत्ता पाचवीतील घोलप अर्णव संतोष आणि इयत्ता सातवीतील जगताप अदिती औदुंबर यांचा समावेश आहे.
दरम्यान, मंगळवार, दि. ११ ऑगस्ट २०२६ रोजी केंद्रप्रमुख जगताप सर यांनी लिटल स्टार इंटरनॅशनल स्कूलला भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयातील वाक्ये लिहून वाचून दाखवली. तसेच भागाकाराची गणिते सोडवून विद्यार्थ्यांनी आपले शैक्षणिक कौशल्य दाखवले. विद्यार्थ्यांच्या या उत्स्फूर्त प्रतिसादाचे केंद्रप्रमुख जगताप सर यांनी कौतुक केले.
यावेळी केंद्रप्रमुख जगताप सर यांनी विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी मार्गदर्शन केले. शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविलेल्या अक्षरा भोसले, अर्णव घोलप आणि अदिती जगताप या विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
याप्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका संध्या दिवाणे, संस्थापक दिवाणे सर तसेच सर्व शिक्षकवृंद उपस्थित होते. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल शाळा परिसरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Post a Comment
0 Comments