Type Here to Get Search Results !

शिक्षक चंद्रशेखर पाटील यांना केंद्रीय ‘प्रेरणा पुरस्कार

 शिक्षक चंद्रशेखर पाटील यांना केंद्रीय ‘प्रेरणा पुरस्कार 

कळंब : प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ, शाखा कळंब यांच्या वतीने प्राथमिक शिक्षक चंद्रशेखर पाटील यांना केंद्रीय स्तरावरील ‘प्रेरणा पुरस्कार २०२६’ प्राप्त झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन करण्यात आले.

शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी योगदान देणाऱ्या शिक्षकांचा गौरव करण्यासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे .शिक्षक चंद्रशेखर पाटील यांनी आपल्या शैक्षणिक कार्यातून विद्यार्थ्यांना प्रेरणा देत शिक्षक क्षेत्रात उल्लेखनीय योगदान दिले आहे.

त्यांच्या या कार्याची दखल घेत त्यांना केंद्रीय पुरस्कार ‘प्रेरणा पुरस्कार २०२६’ मिळाल्याने कळंब तालुक्यातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकवर्गातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

या यशाबद्दल समस्त शिक्षकवर्ग, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांच्या वतीने पाटील सर यांचे अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

Post a Comment

0 Comments