Type Here to Get Search Results !

शिक्षक दिनानिमित्त ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयात शिक्षकांचा सन्मान


विकसित भारताच्या निर्मितीसाठी शिक्षकांची विशेष भूमिका

शिक्षक दिनानिमित्त ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयात शिक्षकांचा सन्मान











येडशी (प्रतिनिधी) : विकसित भारताच्या निर्मितीमध्ये शिक्षकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, विद्यार्थ्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत त्यांच्यामध्ये संस्कार, मूल्ये आणि सकारात्मक विचार रुजविण्याचे महान कार्य शिक्षक करीत असतात, असे प्रतिपादन शिक्षक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात करण्यात आले.

दि. ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिनाचे औचित्य साधून प्रजापिता ब्रह्मकुमारी ईश्वरीय विद्यालयाच्या वतीने येडशी गावातील तसेच परिसरातील शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी उपस्थित शिक्षकांना राखी बांधून प्रेम, आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेने त्यांचा गौरव करण्यात आला.

शिक्षक हे विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक, प्रेरणास्थान आणि संस्कारदाते आहेत. त्यांच्या माध्यमातूनच चारित्र्यवान, मूल्यनिष्ठ आणि जबाबदार नागरिक घडतात. त्यामुळे विकसित भारताच्या निर्मितीसाठी शिक्षकांनी मूल्यशिक्षणासोबतच आध्यात्मिक शिक्षणालाही प्राधान्य देणे आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमात शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला. प्रेम, आदर आणि कृतज्ञतेच्या भावनेने साजरा झालेला हा शिक्षक दिनाचा कार्यक्रम उपस्थित सर्वांसाठी प्रेरणादायी ठरला. शिक्षकांच्या समाजातील तसेच राष्ट्राच्या जडणघडणीतील अमूल्य योगदानाबद्दल यावेळी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

यावेळी ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्वविद्यालयाच्या संचालिका ब्रह्मकुमारी प्रियंका जाधव यांच्यासह रामचंद्र देशमुख, धर्मराज देशमुख, बाळासाहेब शिंदे, बबीता अनपट, किरण धुमाळ, आप्पासाहेब भोरे, श्रीमंत नवले, मुरहरी सावंत, दत्तात्रय देशमुख, श्रीमती सुनीता नलावडे, जगदाळे मॅडम, वसंत भोसले, दिलीप पाटील, सत्यवान पाटील आदी उपस्थित होते.


Post a Comment

0 Comments