Type Here to Get Search Results !

दहिफळ ग्रामपंचायतीत नवनियुक्त प्रशासक व अधिकाऱ्यांचा सत्कार

 दहिफळ ग्रामपंचायतीत नवनियुक्त प्रशासक व अधिकाऱ्यांचा सत्कार

बदली झालेले ग्रामपंचायत अधिकारी मडके यांना निरोप; नव्याने नियुक्त अधिकारी काळे व करपे यांचे स्वागत

दहिफळ (प्रतिनिधी) : कळंब तालुक्यातील दहिफळ ग्रामपंचायतीत नवनियुक्त प्रशासक काळे साहेब व नवनियुक्त ग्रामपंचायत अधिकारी करपे साहेब यांचे स्वागत करण्यात आले. तसेच बदली झालेले ग्रामपंचायत अधिकारी मडके साहेब यांचा सन्मान करून त्यांना निरोप देण्यात आला.

यावेळी माजी सरपंच चरणेश्वर पाटील,शिवशंकर भातलवंडे

महादेव भातलवंडे,पोपट पाटील,सुरेश मते,वसंत धोंगडे,

किरण भातलवंडे,बापुराव भातलवंडे,नामदेव खंडागळे,

समाधान मते,सुजित भातलवंडे,डि एस भातलवंडे,अदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

यावेळी ग्रामपंचायत प्रशासनाच्या कामकाजात नव्या अधिकाऱ्यांनी गावाच्या विकासाला गती देण्यासाठी सहकार्य करावे, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली. उपस्थितांनी नवनियुक्त अधिकाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

0 Comments