Type Here to Get Search Results !

प्रसिध्द पर्यटन क्षेत्र रामलिंग देवस्थान येडशी (वेदश्री)

 









श्रावणी सोमवार-३रा

विशेष लेख.

धाराशिव जिल्ह्यातील सोलापुर-धुळे महामार्गावर असलेले येडशी गाव याच गावापासुन प्रसिध्द पर्यटन क्षेत्र रामलिंग देवस्थान आहे. या ठिकाणची यात्रा श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी असतो.रामलिंग देवस्थान साधे सुधे नाही .तिथे राम व लक्ष्मण आले होते.सितेचे रावणाने अपहरण केले होते.राम लक्ष्मण सितेला शोधत आले.रावण जटायु पक्षाचे युध्द झाले होते.रावणाने जटायु पक्षाचे पंख कापले होते.जखमी अवस्थेत जटायु रामलिंग  या ठिकाणी पडला.राम लक्ष्मण तेव्हा तिथे आले.जखमी जटायुने सगळी घटना सांगितली.व आपला प्राण सोडला.रामाने जटायु पक्षाचा अंतविधी केला.शिवलिंगाची स्थापना केली.व पुढे लंकेकडे राम लक्ष्मण निघून गेले.रामाने शिवलिंगाची स्थापना केली म्हणून रामलिंग असे नाव पडले.

रामलिंग मंदिराचा परिसर हिरवाईने नटलेल्या डोंगर रांगात खोलभागात मंदिर आहे.मंदिराकडे जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत.खाली उतरताना बाजुला कटड्यावर माकडे व त्यांची पिल्ले बसलेली दिसतात.

येणारे जाणारे त्यांना केळी,काकडी,फुटाने,खायला देतात.सततची माणसाची वर्दळ असल्याने माकडांची भिती कमी झाली आहे.ती माणसाळली आहेत.

श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी भाविकांची गर्दी होते.

जिल्ह्यातील पर्यटक निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी येतात.

शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांची सहल या ठिकाणी येते.

रामलिंग मंदिराजवळच काही अंतरावर धबधबा आहे.तोच धबधबा मुख्य आकर्षणाचे ठिकाण आहे.त्या धबधब्याखाली अनेकजण भिजून आनंद घेतात.फोटो काढण्यासाठी एकच झुंबड असते.

रामलिंगापासुन काही अंतरावर घनदाट जंगलात गुरूकुल आहे.संस्कृत भाषा तिथे शिकवली जाते.तसेच ते ठिकाण पुरातण आहे त्याठिकाणी ऋषी महामुनी जप तप करण्यासाठी येत होते.वेदाचा अभ्यास तिथे केला जायचा. ते ठिकाण म्हणजे गुरूकुल होय.तसेच गुरुकुलच्या काही अंतरावर वै.हभप भगवान भाऊ येडशीकर यांची समाधी आहे.भगवान भाऊ येडशीकर यांनी ४१ गावात वारकरी संप्रादाय उभा केले.हजारो टाळकरी,पकवाज वादक ,गायणाचार्य तयार केले.

समाधी स्थळापासुन एक किमी अंतरावर दुर्गादेवीचे मंदिर आहे.तिथे इंग्रज अधिकारी राहत होते.इंग्रजांनी दगडी बांधकाम केलेली  इमारत आहे.दुर्गादेवीच्या टेकडीवरून बार्शी पर्यंतचा भुभाग सहज दिसतो.

इंग्रजांचा आवडीचा परिसर रामलिंग हे ठिकाण मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राच्या सीमेवर आहे. पूर्वी हा भाग पश्चिम महाराष्ट्रात होता. त्याकाळी मराठवाड्यात निजाम आणि या भागात इंग्रज होते. थंड हवेचे ठिकाण असल्याने आरोग्यासाठी इंग्रज अधिकारी आपल्या कुटुंबासोबत येथे वास्तव्य करत होते. आजही इंग्रजांनी बांधलेले विश्रामगृह मोठ्या दिमाखात उभे आहे. तर त्यांनी त्याकाळी बांधलेले रेल्वे स्थानकाचे काही अवशेषही येथे दिसून येतात.

असे हे पर्यटन क्षेत्र आहे.येडशी गावाचे जुने नाव वेदश्री आहे.

चोराखळी हे अहिल्यादेवी होळकरांचे आजोळ आहे.चोराखळी गावापासुन तीन किमी अंतरावर पापनास देवस्थान आहे.पापनास मंदिर हे रामाच्या काळातील आहे.त्या मंदिराचा जिर्नोध्दार अहिल्यादेवी होळकर यांनी केला.

अश्या ऐतिहासिक ठिकाणी आपण प्रत्येक वर्षी सहल नेहली पाहिजे.भारताच्या नव्या पिढीला आपला इतिहास अभ्यासता येईल.

लेखक-योगराज पांचाळ दहिफळकर


Post a Comment

0 Comments