Type Here to Get Search Results !

संपादकीय-धाराशिव स्टार न्यूज सुरू का? केले

 संपादकीय-

धाराशिव स्टार न्यूज......का सुरू केले

गेल्या १५ वर्षांपासून पत्रकारितेच्या क्षेत्रात काम करत आहे.खरं तर मी शालेय जीवनात असताना मी मोठा होऊन पत्रकार होईल असे वाटले नव्हते.मला लहानपणापासून चित्र काढण्याची आवड होती.खापरी पाटीवर पेन्सिलने

मस्त चित्र रेखाटली.शाळेत असताना मी चित्रकलेत फेमस होतो.अभ्यासापेक्षा मी चित्र काढण्यात रमुन जायचो.जास्त पुस्तक वाचायची सवय नव्हती.दहावी नापास झालो.पेन्टीगची कामे करू लागलो.घरं रंगवत चित्र काढत गेलो.त्यात पुस्तकं वाचायची सवय लागली.ऐतिहासिक, धार्मिक, सामाजिक पुस्तकं वाचण्यात आली.अभ्यासात भर पडली.शब्दांची ओळख झाली.व माझ्यातला लेखक कवी जागा झाला.वहीत मी लिहून काढले.जसं जमेल तसे लिहीत गेलो.हीच लिहिण्याची सवय पुढे बातमी मध्ये रूपांतरित झाली.दैनिक एकमत मधून माझ्या लेखणीला सुरुवात झाली.बातमी कशी लिहावी हे मला माहीत नव्हते.पेपर वाचून मी बातमी लिहायला शिकलो.गावातील घटना, सामाजिक राजकीय शैक्षणिक विषय शोधून मी बातमी लिहीत गेलो.मला कुठलेही मार्गदर्शन नाही मिळाले.

मी लिहीत गेलो.कधी कधी वाईट अनुभव घेतले.कधी कधी भांडणं ओढून घेतली.परंतू समाजसेवेचे वेड डोक्यात होते.

मी न डगमगता लिहीत गेलो.कुठलीही आर्थिक लाभाची अपेक्षा न करता पत्रकारितेत १५ वर्ष कशी उलटून गेली ते कळालच नाही.सध्या सोशल मिडीयाचा काळ आहे.मोबाईलवर एका क्लिकवर जगातील माहिती उपलब्ध होते.चालु घडामोडी लगेच कळतात.प्रत्येकाजवळ मोबाईल आहे.परिसरातील, गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील माहिती मिळण्यास मोबाईल हे माध्यम उपलब्ध झाले आहे.गरजेच्या दृष्टीने मुलभूत गरजा मध्ये मोबाइल गरजेचा झाला आहे.चालु घडामोडी लगेच बघण्यासाठी माणुस इच्छुक असतो.परिसरातील असो की गावातील, तालुक्यातील असो की जिल्ह्यातील बातमी सोशल मीडियावर समजते.

मग माझ्या लक्षात आले की काळानुसार आपण ही बदल केला पाहिजे.स्वता:चे एक न्यूज चॅनल पाहिजे.एम एच २५ लाईव्ह मराठी हे युट्यूब चॅनल सुरू केले.५ हजार सबस्क्राईबर झाले होते.लोकापर्यंत चॅनल गेले होते.परंतू माझा मोबाईल हॅक झाला व ते चॅनल बंद केले गेले.दुसरे काढले.चला म्हटलं पोर्टल सुरू करावं.

धाराशिव स्टार न्यूज हे नाव सुचलं.

एक पत्रकार म्हणून लिहिण्याची सवय लागली आहे.घटना घडली.समस्या दिसल्या की लेखणी सुरू होते.लोकं ही काही कार्यक्रम असला तर बोलावतात.प्रसिध्दी कुणाला नको वाटते.मग त्यांच्यासाठी,हे माध्यम निवडले.

आतापर्यंतचा प्रवास केलाच आहे.समाजाप्रती मनात नेहमीच एक प्रश्न राखीव असतो.समस्या दिसल्या की त्या सोडविण्यासाठी मी नाही म्हणलं तर लिहीत आलोय.

एक बातमीदार म्हणून कार्यरत तर असतोच.परंतु चांगल्या विषयावर विचार मांडणं हे आपले कर्तव्य आहे.या भावनेतून धाराशिव स्टार न्यूज पोर्टल सुरू केले आहे . चांगला विषय निवडून त्याचे संपादन नक्कीच करेल.

माझ्या जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील स्टार शोधून त्यांची बातमी वाचकांना उपलब्ध करून देणार आहे.

आपण वाचक म्हणून नक्कीच स्विकार कराल याची मला खात्री आहे.

एक संपादक म्हणून नेहमीच चांगले विषय मी मांडण्याचा प्रयत्न करेल.आपले सहकार्य मिळावे हीच अपेक्षा व्यक्त करतो.

 लोकशाहीर, साहित्यरत्न, अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीचे औचित्य साधून धाराशिव स्टार न्यूज पोर्टल आपल्या हाती देतोय.त्याचे आपण स्विकार करावा.


गुलामगिरीच्या चिखलामध्ये रुतून बसला का एरावत 

दंड ठोकूणी निघ बाहेरी घे बिन्नीवर धाव 

जग बदल घालूनी घाव सांगून गेले मज भीमराव 

अण्णा भाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन.....


आपलाच योगराज पांचाळ दहिफळकर

मो.७७४१०५७९७३


Post a Comment

0 Comments