धाराशिव स्टार न्यूज वृत्तसेवा
कळंब प्रतिनिधी-
कळंब-शिराढोण- लातूर या रस्त्याने डांबरीकरणाचे करण्यात आले आहे. मात्र या रस्त्यावरील वळणावर सुरक्षा चे फलक नसल्यामुळे वारंवार अपघात होत आहेत. यामध्ये एक युवकाला जिव गमवावा लागला आहे. आणखीन किती जिव गेल्यास जाग येणार आहे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लातूर-कळंब या राज्यमार्गाचा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 'हायब्रिड अॅन्युईटी' अंतर्गत सुधारणा होत आहे. यासाठी दोन्ही तालुक्यातील ६० किमी विकासाचा १८८ कोटी रूपयाचा ठेका देण्यात आला. कळंब लगतचे डिकसळ ते राजणी हद्दीत ३० किमी होणार आहे. लातूर-कळंब या राज्यमार्गाची मागच्या काही वर्षापूर्वी काम करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. याच रस्त्यावर तालुक्यातील सर्वात बांधकाम मोठे गाव शिराढोण येते. मुरुड, अंबाजोगाई व लातूर यांना 'कनेक्टिव्हिटी' देण्यास हा रस्ता मोठा मदतगार ठरत आहे. बांधकाम विभागाच्या हायब्रिडन्युटी धोरणाअंतर्गत या रस्त्याची सुधारणा करण्यास मंजुरी देण्यात आली. सध्या या रस्त्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.
सदरील रस्ता आस्तिवातील रुदींचा विचार करुण ४० फुट डांबरीकरण करण्यात आले आहे. यामुळे भरधाव वेगाने प्रवास केला असता जुन्या पुलाजवळ अरुंद असल्यामुळे वाहन चालकांना याचा अंदाज येत नसल्यामुळे हे जुने पुल मौत का कुवा बनले आहे.
कळंब - शिराढोण - लातुर साधारण तीस किमी चा रस्ता बनवण्यात आला आहे. या रस्त्यावर वळण डिकसळ, करंजकल्ला, लोहटा (पुर्व), शिराढोण, ताडगाव, आदी भागात धोकादायक वळण असल्यामुळे वारंवार अपघाताला अमंत्रण मिळत आहे. काही जणांना जिव
गमवावा लागला आहे. तर काहींना कायमचे अपंगत्व आले आहे.
शहरातील युवक रमेश होनराव याचा करंजकल्ला जवळील वळण न समजल्यामुळे तो रस्त्याच्या बाजुच्या खड्यात जाऊन पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे आणखीन किती जिव गेल्यावर वळणावर फलक लावण्यात येणार आहेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कळंब-शिराढोण- लातूर या रस्त्याने डांबरीकरण करण्यात आले आहे. अनेक ठिकाणी धोकादायक वळण झालेले असताना सुध्दा यावर फलक नाही. मात्र याबाबत कुठलाच लोकप्रतिनिधी का बोलत नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे.
कळंब येथील तरुण
रमेश होनराव दुचाकी वरुन कळंब कडे येत असताना करंजकल्ला येथील धोकादायक वळण लक्षात न आल्यामुळे थेट दुचाकी खड्यात गेली व युवकाचा जागीच मृत्यू झाला आहे

Post a Comment
0 Comments