Type Here to Get Search Results !

वै.हभप भगवान भाऊ येडशीकर यांची पुण्यतिथी विशेष लेख

 


धन्य आजि दिन ! जाले संतांचे दर्शन !!१!!

जाली पापातापा तुटी ! दैन्य गेले उठाउठी!!२!!

जाले समाधान ! पायीं विसावले मन !!३!!

तुका म्हणे आले घरा ! तोची दिवाळी दसरा!!४!!


संत भगवानभाऊ येडशीकर.


पुण्यतिथी विशेष शब्द प्रपंच.....


वै.ह.भ.प रामकिसनभाऊ वै.ह.भ.पभगवान भाऊ येडशीकर उस्मानाबाद जिल्ह्यातील थोर विठ्ठल भक्त....येडशी परीसरातील ४० गावात वारकरी सांप्रदाय उभा करण्याचे महान कार्य या दोन भाऊंनी केले.येडशी ते पंढरपुरवारी भाऊंच्या मार्गदर्शनाने सुरु झाली.....निजामाच्या राजवटीत हा उस्मानाबाद जिल्हा होरपळुन निघाला होता.जिथं माणुस म्हणुन जगणं कठीन होते.तिथे देवाची भक्ती करणे तर दुरच.....१९ व्या शतकात या महान संतांचा जन्म या येडशी गावात झाला.मुळ व्यापारी घराने....कापड दुकान,किराणा दुकान हे त्या काळातील भव्य होते.परिसरातील लोक येथुनच खरेदी करत असत.घरी विठ्ठलमय वातावरण....वारकरी साप्रादाय पंती असणारे तापडीया घराणे.....वडीलोपर्जीत चालत आलेला हा व्यापार रामकृष्णभाऊ चालवत असत.तसं भगवान भाऊ ही दुकानात जात असत पण लहानपणापासुन विठ्ठल नामात रमलेले होते.पुढे तरुन वयात विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झाले.संसारापासुन मुक्त होत भक्तीमय जिवन त्यांनी स्वीकारले.हरी भजनात ते जगु लागले.बंकट स्वामींचा त्यांना सहवास लाभला...येडशी येथील दंडकारण्यात भगवान भाऊ व बंकट स्वामी मृदंग टाळ घेऊन एकांतात हरी भजन गात देहभान विसरुन जात असत.असच एकदा ते दोन देवपुरुष घनदाट आरण्यात भजनात रमुन गेले एक दिवस एक रात्र उलठुन गेली होती...घरची मंडळी काळजीत पडली...सर्वत्र शोध घेतला काही ठावठिकाना लागला नाही....शोध घेत असताना...एका पशुपालकाने रामलिंगाच्या जंगलात टाळ मृदंगाचा आवाज येत असल्याचे सांगीतले..घनदाट आरण्य हिंस्र प्राणी वावरत होते त्या जंगलात...पाच दहा माणसे सोबत घेऊन थोरले रामकृष्णभाऊ त्या जंगलात शिरले...शोध घेत असताना घनदाट झाडीत टाळ मृदंगाचा आवाज येउ लागला त्याठिकाणी सर्व मंडळी पोहचली समोरचे दृष्य पाहुन आश्चर्य चकीत झाली बंकट स्वामी गोड आवाजात टाळ वाजवत पांडुरंगाचे गुनगान गात होते.तर भगवानभाऊ मृदंग वाजवण्यात तल्लीन झाले होते.वेळ काळ भान विसरुन दोन महापुरुष विठ्ठलाचे नामस्मरण करत होते.मृदंग वाजवुन भाऊंच्या दोन्ही हाताच्या बोटातुन रक्त वाहीले होते.बोटे फुटली होती.डोळे मिटुन दोघेही तल्लीन आवस्थेत जसं काय समाधीच लागली....थोरल्या भाऊंनी मोठ्याने आवाज दिला पण काही प्रतिसाद आला नाही.शेवटी भाऊंनी भगवान भाऊंच्या खांद्याला हात लाऊन गदागदा हालऊन भानावर आनले.बंकट स्वामी मृदंग बंद झाल्यामुळे भानावर आले.....हरी भक्तीत रमलेला माणुस देहभान हारवुन जातो.याचे कैक उदाहरणे आहेत.

भगवानभाऊ येडशीकर हे नाव कुणाला माहीत नाही असे महाराष्ट्रातील एक ही गाव नसेल....वारकरी सांप्रदाय ऊभा करण्यासाठी भाऊंनी आपली हयात घालवली.....एवढेच काय स्वत:च्या घरी मठ तयार करुन मुलांना टाळ मृदंग वाजवायचे धडे दिले हजारो वारकरी भाऊंनी तयार केले.शेकडो किर्तनकार घडविले.तेही एकरुपया न घेता.स्वत: भाकरी थापुन पहीली फळी घडवली.भाऊंनी ब्रम्हत्व स्वीकारले होते.मोह माया जाळ या बंधनातुन ते मुक्त झाले होते.वारकरी सांप्रदाय उभा करण्यासाठी स्वत:ची इस्टेट मार्गी लावली....समाजाचा एक रुपया ही आपला समजला नाही...हजारो वारकरी गावोगाव तयार झाले....येडशीकरांची दिंडी...पंढरपुरात नवाजलेली दिंडी....भाऊंचे शिष्य महाराष्ट्रातील कानाकोप-यात तर आहेतच पण बाहेर राज्यातही आहेत.

थोरले रामकृष्णभाऊंचा वारसा..गोविंद महाराज नागटिळक चालवत आहेत.तर भगवान भाऊंचा वारसा.वै.ह.भ.प सोपान काका बेदरे यांनी चालवला....काही वर्षापुरवी ह.भ.प सोपान काका वैकुंटवाशी झाले.त्याच्या नंतर काकांचे चिरंजीव भास्कर गुरुजी फड सांभाळत आहेत...... 

निजामाच्या राजवटीत वारकरी सांप्रदायची मुहुर्त मेड रोवणारे....हजारो वारकरी घडवणारे रामकृष्णभाऊ व भगवानभाऊ येडशीकर यांच्या कृपाशिर्वादाने पंढरीची वारी सुरु झाली......

म्हणुन तुकोबारायांच्या म्हणन्याप्रमाणे ...

धन्य आजि दिन ! जाले संतांचे दर्शन....

जाली पापातापा तुटी! दैन्य गेले उठाउठी...

संत येती घरा हाच आपल्यासाठी खराखुरा दिवाळीदसरा हाच सन मोठा आहे..........       

-------- योगराज पांचाळ७७४१०६७९७३

Post a Comment

0 Comments