Type Here to Get Search Results !

पानगावात वै.हभप भगवानभाऊ येडशीकर यांची पुण्यतिथी साजरी



धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा 
पानगाव :-कळंब तालुक्यातील पानगाव येथे वै.हभप भगवान भाऊ येडशीकर यांची ३४वी पुण्यतिथी टाळमृदंगाच्या गजरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
भगवान भाऊ येडशीकर यांचे पानगाव आजोळ आहे.भाऊंचे जन्मगाव पानगाव आहे.वारकरी संप्रादायाची भगवी पताका जवळपास ४१गावात भगवानभाऊंनी फडकावली.मृदंगवादक,टाळकरी,गायक तयार केले.
भाऊंचे शिष्य महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आहेत.
         धाराशिव जिल्ह्यातील येडशी ही कर्मभुमी होती.वडीलोपर्जीत कपड्याचे,किरणादुकान  होते.
तापडीया घराणे म्हणजे प्रसिध्द व्यापारी घराणे.
तापडिया घराण्यात भाऊंचा जन्म झाला.ते लहान असल्यापासुन विठ्ठलाच्या भक्तीत रमत असत.

संसार रुपी सागरात न बुडता त्यांनी ब्रम्हचार्यत्व पत्कारले
 व वारकरी संप्रादाय वाढविण्यासाठी हयात घालवली.
भाऊंनी राहत्याघरी मृदंग,टाळ,गायनाचे धडे देऊन हजारो शिष्य घडविले.कार्तिकी,आषाढी वारीला जाणारी मोठी दिंडी येडशीकरांची दिंडी होय.
येडशीकरांचा फड महाराष्ट्रात नावलौकीक आहे.
पानगाव हे त्यांचे आजोळ असल्यामुळे समस्त पानगावकर
लहान लेकरासहीत प्रत्येक घरात आनंदी वातावरणात पुण्यतिथीची तयारी करतात.प्रत्येक घरासमोर रांगोळी काढली जाते.प्रत्येक घरातुन अन्नदान केले जाते.

डिकसळ येथील दत्ता महाराज अंबीरकर यांची किर्तनसेवा भरपावसात संपन्न झाली.किर्तन झाल्यानंतर बैलगाडीतून भगवान भाऊंच्या प्रतिमेची टाळमृदंग,हलगी तालात मिरवणुक काढण्यात आली.सारा गाव भक्तिमय झाला होता.
येरमाळा,संजीतपुर,सापनाई,शेलगाव,बाभळगाव,
परतापूर,उंबरा,दहिफळ,मलकापूर सह जिल्ह्यातील वारकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.


Post a Comment

0 Comments