Type Here to Get Search Results !

श्री येडेश्वरी देवी नवरात्र महोत्सव आढावा बैठक प्रांत अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

 

श्री येडेश्वरी देवी नवरात्र महोत्सव आढावा बैठक प्रांत अधिकारी संजय पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न

येरमाळा प्रतिनिधी - 

येरमाळा ता कळंब येथे श्री येडेश्वरी देवीचा नवरात्र महोत्सव 22 सप्टेंबर पासून सुरू होत असून श्री येडेश्वरी देवी नवरात्र महोत्सवाच्या तयारीची आढावा घेण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस एसडीओ संजय पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली पोलीस विभाग, महसूल विभाग, आरोग्य विभाग, बांधकाम विभाग,स्थानिक ग्रामपंचायत तसेच सर्व शासकीय विभागांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

नवरात्र महोत्सव काळात महाराष्ट्रभरातून भाविकांची देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असल्याने शिस्तबद्ध व सुरक्षित वातावरण निर्माण करण्यावर भर देण्यात आला. यामध्ये वाहतूक व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, मंदिराकडे जाणारा रस्ता तसेच सुरक्षा या सर्व बाबींची सविस्तर चर्चा करण्यात आली. व योग्य ती दक्षता घेण्याचे आदेश देण्यात आले.

प्रशासनाच्या वतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्याचे आश्वासन देण्यात आले असून सर्व विभागांमध्ये समन्वय ठेवून महोत्सव यशस्वी करण्याचे, व येणाऱ्या भाविकांच्या दृष्टीने सुख सोयी करण्याचे आवाहन करण्यात आले. यावेळी यावेळी प्रांत साहेब संजय पाटील, सहाय्यक पोलीस उपअधीक्षक जाधव साहेब, तहसीलदार हेमंत ढोकळे साहेब, सरपंच प्रिया बारकुल उपसरपंच गणेश बारकुल, मा सभापती विकास बारकुल, देवस्थान ट्रस्ट सह सर्व अधिकारी, गावकरी, पत्रकार उपस्थित होते.


धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री व महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री मा. ना. श्री प्रताप सरनाईक साहेब, मानोरकर साहेब सचिव, ओएसडी खाडे साहेब, वसेकर साहेब, अजित सावंत साहेब यांनी येडेश्वरी देवीचे दर्शन घेतले देवस्थान विकास आराखड्या अंतर्गत चालू असलेल्या कामाचे पाहणी केली, यावेळी देवस्थान ट्रस्ट च्या वतीने त्यांचा येडेश्वरी देवी फोटो शाल फेटा श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला.


समाधान बेंद्रे देवस्थान ट्रस्टी 

नवरात्र महोत्सवाच्या दृष्टीने भाविकांच्या सोयीसाठी सर्व सुख सुविधाचे चोख नियोजन श्री येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट कडून केले असल्याचे सांगण्यात आले

Post a Comment

0 Comments