येडशी महामार्गावर पुलावरून पाणी लातुर टेंभुर्णी वाहतुक ठप्प
येडशी प्रतिनिधी-महेश पवार
लातुर टेंभुर्णी महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु आहे.येडशी गावालगत असणाऱ्या पुलाचे काम चालू असुन पर्याय मार्ग काढला आहे .मात्र तो पावसाच्या पाण्याने खचला आहे.यंदा पावसाचा जोर चांगलाच असुन पाणी मोठ्याप्रमाणात या मार्गावर जात आहे.हा मुख्य मार्ग असुन मोठी वर्दळ वाहनांची आहे.गेल्या काही दिवसापासुन या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत.तसेच रस्त्यावर पावसाचे पाणी साचल्यामुळे वाहतुक करणाऱ्यांना खड्ड्यांचा आंदाज येत नाही .अनेकजण गाडी घसरून पडले आहेत.जखमी झाले आहेत.
प्रशासनाला काही जाग आलेली नाही.लवकरच येडशीकर मोठ्या आंदोलनाच्या तयारीला लागणार आहेत

Post a Comment
0 Comments