गटविकास अधिकाऱ्यांची बाभळगांव ग्रामपंचायतला दिली भेट
दहिफळ प्रतिनिधी-
मराठवाडा मुक्ती संग्राम दिन निमीत्त बाभळगांव येथे सरपंच सुजाता तुषार वाघमारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. तसेच सरंपंच यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा आयोजित करण्यात आली. यावेळी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानात सक्रिय सहभाग नोंदवण्यासंदर्भात ग्रामसभेने एकमताने निर्णय घेतला, या अभियानात शासनाने घालुन दिलेले निकष पुर्ण करण्यासाठी सर्वोत्परी प्रयत्न करण्याचा निश्चय गावातील नागरीकांनी केला.प्रसंगी उपसरपंच विजयश्री वाघमारे ग्रामपंचायतचे सर्व सदस्य, नागरिक मोठ्या संखेने उपस्थित होते.
प्रसंगी पाणीपुरवठा विभागाचे अभियंते अक्षय पवार यांनी नागरिकांना जलजीवन मिशन संदर्भात मार्गदर्शन केले.
दुपारनंतर कळंब पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मा.विनोदजी जाधव साहेब यांनी विस्तार अधिकारी मा.दत्तात्र्य साळुंके साहेब व मा.झांबरे साहेब,ग्रामपंचायत अधिकारी मा.उमेश बारकुल यांच्यासह ग्रामपंचायत कार्यालयात बैठक घेतली. तब्बल तीन तास चाललेल्या बैठकीत अभियान संदर्भात महत्वपुर्ण माहिती दिली. गावकऱ्यांच्या निर्णयाचे कौतुक करुन, आपण कामाला लागा आमचे सर्वोत्परी सहकार्य मिळेल असे सांगुन उपस्थितांचा उत्साह वाढवला.

Post a Comment
0 Comments