ओढ्याच्या पुलावर पूराचे पाणी: वाहत्या पाण्यातून वाट काढत विद्यार्थी गेले शाळेत
*आमदारांनी नवीन पुलबांधनीचे दिले पत्र ,अद्यापपर्यंत
काम झालेच नाही.
*जिव मुठीत धरुन विद्यार्थ्यांना शाळेत जावे लागते.
दहिफळ प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील दहिफळ येथे दि २१सप्टेंबर वार रविवार रोजी रात्री ११.३० वाजता जोरदार मुसळधार पाऊस झाला.पावसाचे पाणी
दहिफळ परतापुर रस्त्यावर गुडघाभर पाणी वाहत होते.तर अनेकांच्या घरात पाणी शिरले होते.ढगफुटी झाल्याची चर्चा होत आहे.
गावातील नाल्या,रस्त्यावरून गच्च भरून पाणी वाहिले.पावसाची एवढी तिव्रता होती की सगळीकडे पाणीच पाणी दिसत होते.
सकाळी १२ वाजेपर्यंत ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत होते.
शाळेची वेळ सकाळी १० ची आहे.विद्यार्थी शाळेला जाण्यासाठी निघाले तर पुलावरून पाणी वाहत होते.शाळेला तर जावे लागणार.साकळी धरून एकमेकांच्या हाताला धरून विद्यार्थ्यांनी पाण्यातुन वाट काढत शाळेची वाट धरली.काही मुली सायकल घेऊन वाहत्या पाण्यातुन शाळेत गेल्या. गावातील अंशकालीन शिक्षक महादेव भातलवंडे यांनी विद्यार्थ्यांचे ग्रुप करून साकळी पध्दतीने स्वत:मुलांना हाताला धरून वाहत्या पाण्यातून वाट काढत शाळेच्या दिशेने सोडले.
अशी सध्या परिस्थीती असुन ओढ्यात असणाऱ्या पुलाचे बांधकाम नव्याने करण्याची गरज आहे.
गेल्यावर्षी पुरजन्य परिस्थीतीची पाहणी आमदार कैलास पाटील यांनी केली होती.तसेच भेटीनंतर पुलाच्या नवीन बांधकामाचा प्रस्ताव तयार करून संबंधीत विभागाच्या अधिकाऱ्यांना तात्काळ कामाची मंजुरी द्यावी असा आदेश दिला होता.एक वर्ष झाले अद्यापपर्यंत पुलाच्या कामाची सुरूवात झालेली नाही.
मुसळधार पावसात ओढ्याला पुर आला होता.याचे वृत्त प्रकाशीत होताच.
बांधकाम विभागातील स्थापत्य अभियंता अभियांत्रिकी सहाय्यक दशरथ बाराते यांनी दि.२२सप्टेंबर रोजी पाहणी केली.त्यांच्याशी संवाद साधला असता.ते म्हणाले की गेल्यावर्षी नाबार्डकडे प्रस्ताव दिला आहे.परंतु निधी उपलब्ध नसल्यामुळे काम झालेले नाही.असे सांगण्यात आले आहे.तसेच गावातील नागरिक यांनी पुलाचे काम लवकर करा अशी मागणी केली आहे.
प्रतिक्रीया-
दहिफळ परतापुर रस्त्यावर गावाजवळ असणाऱ्या पुलाची अत्यंत दुरावस्था झाली आहे.पावसाळ्यात पुलावरून पाणी येते.त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांना शाळेत जाता जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो.लवकरात लवकर पुलाची उंची वाढवावी.
आमदार साहेबांनी पुलाचा प्रस्तावाचे पत्र दिले होते.त्याचे काय झाले कळायला मार्ग नाही.तरी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुलाची परिस्थीती बघून ठोस पावले उचलून नवीन पुलाचे बांधकाम करावे अशी आमची मागणी आहे.
ग्रामस्थ-सुरेश नवनाथ मते.दहिफळ.

Post a Comment
0 Comments