येडशी येथे एसटी कर्मचारी व नागरिकांमध्ये बाचाबाची
येडशी प्रतिनिधी : महेश पवार
येडशी ता. जिल्हा धाराशिव येथे एसटी कर्मचारी व नागरिकांमध्ये दि २७ -९-२०२५ रोजी येडशी येथे बसचा स्टॉप असताना देखील येडशी बायपस त्या ठिकाणी प्रवाशांना सोडले कारणावरून बाचाबाची झाली.
याबाबत माहिती अशी की, येडशी येथील रहिवासी फारूक शिकलगार यांचे नातेवाईक येडशीला येण्यासाठी येरमाळा बस स्टँड या ठिकाणी थांबले असता अंबड आगाराची बस क्र एम एच १४ बी टी २५०३ मध्ये बसताना वाहकने जादा गाडी असल्याने येडशीला स्टॉप नाही. असे सांगून चार प्रवाशांना उतरले ज्यांना यायचे आहे त्यांनी बायपासला उतरावे लागेल सांगितले बराच वेळ गाडी नसल्याच्या कारणाने शिकलगार यांचे नातेवाईक बसमध्ये बसले असता त्यांना येडशी बायपस येथे उतरवून परत गाडी बस स्टॅन्डला आली .
येडशी हे गाव धुळे सोलापूर लातूर टेंभुर्णी या दोन राष्ट्रीय महामार्गावर असल्याने दररोज येडशी बस स्थानकात अंदाजे तीनशे ते साडेतीनशे बसची आवक जावक होते.
असताना देखील असे प्रकार सतत घडतात असे येडशी परिसरातील नागरिकांना सांगण्यात येत आहे .अश्या मुजोर कर्मचाऱ्यावर कारवाई व्हावी अशी ग्रामस्थांची व तक्रारदाराची मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments