Type Here to Get Search Results !

प्रसिद्ध हाॅटेल अप्पाचा धाबाचे मालक अप्पासाहेब जोगदंड यांचे निधन

 



आप्पाचा धाबा    नुसता कळंब तालुका नाही तर धाराशिव जिल्ह्यामधील खवय्यांच्या ओठावर येणारे हमखास नाव म्हणजे आप्पांचा धाबा.   हॉटेलच्या व्यवसायाविषयी कोणतीही पार्श्वभूमी नसलेले तसेच कोणतेही पूर्वज्ञान नसलेले व्यक्तिमत्व म्हणजे आप्पासाहेब श्रीरंग जोगदंड. यांना जेमतेम घरची चार-पाच एकर जमीन. त्यातीलही काही जमीन कौटुंबिक  अडचणीमुळे आप्पांनी विकली. हॉटेल चालविण्यासंबंधीचे कोणतेही कौशल्य आप्पा जवळ नव्हते. फक्त शेतात कधी मित्रासमवेत पार्टी केली तर त्या पार्टीत मटणाची भाजी आप्पा बनवायचे.आणि ती भाजी मित्रांना खूप आवडायची. कधीही पार्टी करायची म्हटलं तर ते आप्पाला बोलवायचे व आप्पालाच भाजी करायला लावायचे. सतत भाजी करण्याचा आप्पाला फायदा असा झाला की भाजी बनवण्यामध्ये आप्पा परफेक्ट झाले. आप्पांना तीन मुले व एक मुलगी. मुलांनी व आप्पांनी असे ठरवले की या चवीचे रूपांतर आपण हॉटेल  व्यवसायाच्या माध्यमातून कमाई द्वारे करू,आणि मग  आप्पांनी मुलांच्या मदतीने हॉटेल व्यवसाय सुरू केला. अस्सल गावरान चव घरगुती मसाला वापरून गावरान कोंबडा, बकऱ्याचे मटण   तसेच मच्छी मांसाहारी व शाकाहारी अशा दोन्हीही जेवण्यासाठी आप्पांचा  धाबा खूप  प्रसिद्ध झाला. त्यातून मुलांच्या मदतीने आप्पांनी विकलेली जमीन परत घेतली. सुरुवातीला आप्पांनी हॉटेल एका पत्र्याच्या शेडमध्ये सुरू केले त्यानंतर त्यांनी त्याच ठिकाणी दोन मजली बांधकाम करून त्यामध्ये हॉटेल  सुरू  केले. सोबतीला आप्पांची तीन मुलं,आप्पा व अक्का.. या कुटुंबांनी कष्टाशिवाय काहीच पाहिले नाही. खूप दूर दूरून खास आप्पांच्या हॉटेलची भाजी खाण्यासाठी लोक येत. कधीच न विसरता येणारी भाजीची चव व ग्राहकांची विनम्र सेवा या दोनच गोष्टीवर त्यांनी खूप भरभराटी केली.        .... अशातच यांच्या कुटुंबावर किंवा हॉटेल व्यवसायावर कोणाची तरी नजर लागली  🥲  तीन वर्षांपूर्वी आप्पांचा मोठा मुलगा जो व्यवसायाचा खूपच मोठा आधार होता असा श्रीकांत याचे मोटरसायकलच्या अपघातामध्ये दुःखद निधन झाले. हे जोगदंड कुटुंब खूपच दुःखात बुडाले. कर्त्या मुलाचे निधन झाल्यामुळे आप्पांनी व घरच्यांनी खूप मनाला लावून घेतले. यातूनच थोडे मन सावरून पुन्हा नव्या जोमाने धंद्याकडे लक्ष द्यायला सुरू केले मनामध्ये सर्वांच्या दुःख तर होतेच परंतु धंदा सुरू ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता व सर्वांनी दुःख पचवून  कष्ट करायला सुरुवात केली.   त्यातच गेल्या एक वर्षापासून पोटाच्या दुखण्यामुळे आप्पा आजारी पडले दुखण्यातून त्यांना खूपच वेदना होऊ लागल्या व त्यांना व्यवसायात मुलांना मदत करणे शक्य होईना गेले. ज्या व्यवसायामध्ये एकूण चार जण असायचे त्यात श्रीकांत गेला व आप्पा पण आजारी पडले. सर्व हॉटेलचा भार चंदू व रवी या दोघांवरच आला. त्यातून सतत आप्पाला दवाखान्यात घेऊन जावे लागत असे या दोन्ही मुलांनी आप्पांच्या उपचारासाठी कोणतीही उणीव न ठेवता हॉटेल व्यवसाय सांभाळत सांभाळत आप्पांचा दवाखाना केला पाण्यासारखा पैसा खर्च केला मुलाचे कर्तव्य वडिलांसाठी काय असते ते सर्व काही या दोघांनी केले. मोठमोठ्या दवाखान्यात आप्पांना डॉक्टर कडे घेऊन गेले. भरपूर औषध उपचार केले. परंतु नियतीने आणखी दुसरा डाव साधला 🥲🥲🥲 आज शुक्रवार 26 सप्टेंबर रोजी आप्पांचे दीर्घ आजाराने निधन झाले 🥲🥲🥲🥲 वडिलांच्या  दवाखान्यासाठी  मुलांनी केलेली धडपड कामी आली नाही आणि आप्पा सर्वांनाच पोरके करून गेले...... परमेश्वराकडे माझे एवढेच मागणे आहे की आत्ता बास कर.. एकाच कुटुंबाला किती दुःख देतोस. परमेश्वरा तूच विश्वाचा निर्माता आहेस व विश्वाचा अंत करणारा पण तूच आहेस. एवढे हात जोडतो या लेकरावर जो दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे येथून पुढे तरी त्यांना सुखाचे दिवस दे. दुःखातून सावरण्याची शक्ती चंदू व रवीला दे.. 🙏🙏🙏 आप्पा सर्वांचा निरोप घेऊन कायमचे निघून गेले   परंतु  "आप्पांचा धाबा"   या नावाने आप्पांच्या स्मृती हृदयात कायमच्या राहतील. 🙏🥲🥲

-चंद्रशेखर पाटील.

Post a Comment

0 Comments