देवळालीत पुराच्या पाण्यात बैल मरण पावला
कळंब प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील देवळाली(ढोकी)येथील शेतकरी लक्ष्मण चंदर पांचाळ यांचा बैल पुराच्या पाण्यात बुडुन मरण पावला आहे. शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.गेल्या काही दिवसापासुन परिसरात मुसळधार पाऊस कोसळत आहे.
नदीला पुर आला होता.पांचाळ यांचे शेत नदीकाठी असुन बांधावर बैल बांधलेला होता.अचानक नदीला पाणी आले. त्या पाण्यात बैल फसला व जागीच मरण पावला आहे. लक्ष्मण पांचाळ शेतात गेले असता त्यांना बैल पाण्यात मरण पावलेला दिसला. परंतु पाण्याचा प्रवाह वाढलेला असल्यामुळे त्यांना बैलाजवळ जाता आले नाही.
डोळ्यासमोर बैल मरून पडलेला होता. शेतात पिकांचे तर मोठे नुकसान झालेले तर आहेच. नदीच्या पुरात एक बैल गेला. बैलाचा बाजार भाव ५०हजार असुन शेतात काम करण्यासाठी आता बैलाला जोडी राहिला नाही . मोठे आर्थिक नुकसान झाले असुन नुकसान भरपाई शासनाने द्यावी अशी मागणी लक्ष्मण पांचाळ यांनी केली आहे.

Post a Comment
0 Comments