येरमाळा येथील ज्ञानोद्योग ज्युनिअर कॉलेज मध्ये हिंदी दिवस उत्साहात साजरा
येरमाळा प्रतिनिधी .
येरमाळा तालुका कळंब जिल्हा धाराशिव येथील ज्ञानोद्योग ज्युनिअर कॉलेज मध्ये हिंदी विभाग व एनएसएस विभागातर्फे हिंदी दिवस साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळंब येथील हिंदी पंडित प्रा. काझी जे एच हे उपस्थित होते. या कार्यक्रमाच्या वेळी ज्ञानोद्योग ज्युनिअर कॉलेजचे प्रा. सुशील शेळके यांचा पीएचडी मिळविल्याबद्दल सत्कार करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ प्रा. शिंदे व्ही एम हे होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुजूला पायाळे व प्रथा पायाळे या विद्यार्थिनींनी केले तर शिवानी मुंडे या विद्यार्थ्यांनीने अतिशय सुंदर शब्दात आपले विचार मांडले
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एनएसएस विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. हनुमंत कोकाटे ,सहाय्यक कार्यक्रमाधिकारी प्रा.अश्विनी कळसे यांनी व एनएसएस विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले या कार्यक्रमाच्या वेळी प्रा. सयाजी बारकुल प्रा. साहु ए व्ही, प्रा. विनोद बारकुल, प्रा. कैलास जाधव ,प्रा.आचलारे मॅडम, प्रा. शरद बारकुल व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments