अचानक शिक्षकांची बदली...विद्यार्थ्यांना मानसिक धक्का
विद्यार्थी व शिक्षक यांचे नाते आई वडीलां नंतरचे विश्वासाचे,प्रेमाचे घट्ट नाते असते.आई वडीलांप्रमाणे मुलांची काळजी घेणारे शिक्षक विद्यार्थ्यांच्या मनात घर करतात.
वर्गात अभ्यास करा म्हणुन तळमळीने सगळ्या मुलांना सांगतात.अभ्यास का केला नाही म्हणुन मारतात.परंतु मुलावर चांगले संस्कार करण्याचे काम गुरूजी करत असतात.विद्यार्थी शिक्षकात जिव्हाळा निर्माण झालेला असतो.आवडते शिक्षक जेव्हा अचानक बदली होऊन जातात तेव्हा विद्यार्थ्यांना धक्का बसतो.
गेल्या दोन दिवसापासुन विविध शाळेतील शिक्षकांच्या बदलीचे व्हिडीओ वायरल झालेत.शिक्षक,विद्यार्थी रडताना दिसतात.
आमच्या दहिफळ येथील जि प प्राथमिक शाळेतील दोन शिक्षकांची बदली झाली.
माझी मुलगी तिसरीच्या वर्गात शिकते.तिला पंडीत सर होते.
सरांची बदली झाली हे मला माहित नव्हते.गेल्या तीन दिवसापासुन मुलगी शांत शांत वाटत होती.चेहरा सुकलेला होता.माझ्या जवळ आली तिला विचारले काय झालं.डोकं दुखतयं का.ती नाही म्हणाली.आचानक हुंदका यायचा.पण तिला काय होतय हे कळायला मार्ग नाही.सरची बदली झाली.सर गेलं असं काही म्हणायची.मग मी तर्क काढला सरांची अचानक बदली झाली.तिला धक्का बसलाय तिला नीट सांगता येईना झालयं.दुख झालंय पण व्यक्त होता येईना.निरागस मुलांच्या कोवळ्या मनावर झालेला तो अघात होता.शाळा सुरू होऊन तीनच महिने झाले होते.
आता कुठं व्यवस्थीत रुटींग सुरू झाली होती.अचानक बदल्या झाल्या.खरं तर बदलीची प्रक्रीया उन्हाळा सुट्टीत होणे गरजेचे होते.शाळा सुरु झाल्या व तीन महिन्यात चालु शाळा सोडुन नव्या ठिकाणी शिक्षकांना जावे लागले.
इयत्ता पहिली पासुन शिकवणारे शिक्षक मध्येच सोडुन गेल्यामुळे विद्यार्थ्यांत वेगडळेच वातावरण तयार झाले आहे.नवीन शिक्षक कसे शिकवतील,त्यांचा स्वभाव कसाय.जास्त मारतील का?अशी भिती विद्यार्थ्यात आहे.
जिल्हा परिषदेच्या शाळेची वरची वर विद्यार्थी संख्या घटत आहे. पट संख्या कमी झाल्यामुळे शिक्षक ही कमी होत आहेत.परंतु काही शिक्षकांनी आपल्या कौशल्यावर,विविध उपक्रम राबवुन जिल्हा परिषदेच्या शाळेत विद्यार्थी संख्या वाढवली आहे.परंतु अचानक झालेला बदलीचा निर्णय कुठंतरी शाळेचे वातावरण ढवळून गेलं आहे.
विद्यार्थ्यांना मानसिक धक्का देऊन गेला आहे.
संपादक-योगराज पांचाळ दहिफकर

Post a Comment
0 Comments