मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या कळंब तालुका सचिव पदी दत्ता मोरे यांची निवड
कळंब दि.९(प्रतिनिधी)
कळंब तालुक्यातील ईटकुर येथील दत्ता मोरे यांची मानव अधिकार आंदोलन संघटनेच्या कळंब तालुका सचिव पदी नुकतीच निवड करण्यात आली. या वेळी मानव अधिकार आंदोलन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. सदर निवड कळंब येथे करण्यात आली. मानव अधिकार आंदोलन संघटना ही साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ भाऊ साठे, लहुजी साळवे, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू फुले आंबेडकर अशा थोर महापुरुषांच्या विचारावर चालत असून महाराष्ट्रातील वंचित व कष्टकरी, श्रमिक कामगार बांधवांचा उद्धार करण्यासाठी व कामगारांना वंचीतांना न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आरोग्य ,शिक्षण, प्रशासनाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी व शेवटच्या घटकांपर्यंत न्याय हक्क मिळवून देण्यासाठी चळवळ गतिमान करण्यासाठी सदर संघटनेमध्ये दत्ता शाहू मोरे यांची निवड करण्यात आली आहे. तरी सदरील पदाची जबाबदारी त्यांच्यावर आज रोजी देण्यात येत असून संघटने प्रति जबाबदारी पार पाडून कष्टकरी श्रमिक कामगारांना न्याय देऊन सहकार्य कराल अशी अपेक्षा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष हनुमंत भाऊ पाटुळे यांनी या वेळी आपले मत व्यक्त केले. यावेळी पोलीस पाटील संघटनेचे कळंब तालुका अध्यक्ष प्रदीप वायसे(पाटील),पत्रकार अशोक कुलकर्णी,पत्रकार प्रवीण कसबे, शिवाजी वाकळे, विशाल शिरसट,राहुल लोंढे, उपस्थित होते. सदरील निवडीबद्दल मोरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.,

Post a Comment
0 Comments