लातुर -टेंभुर्णी रस्त्याचे काम लवकर करा अन्यथा आंदोलन करू
येडशीकरांचा रास्ता रोखो.
येडशी प्रतिनिधी - (महेश पवार)
लातुर टेंभुर्णी रस्त्याचे नुतनीकरण सुरु आहे.येडशी येथील मुख्य रस्त्यावर खोदकाम केल्यामुळे येथील नागरिकांना अनेक समस्याचा सामना करावा लागत आहे.
गेल्या चार पाच महिन्यापासुन हा रस्ता उकरला आहे.वाहतुक करण्यासाठी नागरिकांची गैरसोय होत आहे.संबंधीत गुत्तेदार मात्र याकडे दुरलक्ष्य करत आहे.गावात पाणी पुरवठा करणारी पाईपलाईन उकरली आहे.पाणी पुरवटा बंद झाला आहे.खड्ड्यामुळे आपघाताचे प्रमाण वाढले आहे.
लातुर टेंभुर्णी रस्त्याचे काम लवकर करावे.अन्यथा येडशीकर मोठ्या आंदोलनाच्या तयारीत आहे.संबंधीत कंपनीला जाग येण्यासाठी रस्ता रोखो करण्यात आला.
उकरलेला रस्ता बुजवून नागरिकांना वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करावा असे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनावर डाॅ.प्रशांत पवार,मंगेश देशमुख,मिथुन शिंदे,महेश पवार,सुनिल शेळके,मच्छींद्र पवार,गणेश खोबरे,ॲड.धैर्यशील सस्ते,अदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

Post a Comment
0 Comments