दहिफळ येथे शेतकऱ्यांना निविष्ठा व किटकनाशक औषधाचे वाटप
दहिफळ प्रतिनिधी-
स्वयंसिद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपणी आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दहिफळ येथिल 25 महिलांना खरिप पिक प्रात्यक्षिक सोयाबीन बियाणे आणि निविष्ठा वाटप कार्यक्रम राबविण्यात आला.सहाय्यक क्रषी अधिकारी भाऊसाहेब खाडे यांच्या हस्ते सोयाबीन बियाणे वाटप करण्यात आले होते.सोयाबिन बियाणे मिळालेल्या शेतकऱ्यांनाच निविष्ठा वाटप करण्यात आल्या.या कंपनीच्या माध्यमातून सर्व प्रगतिशील समाजापर्यंत योजनांचा लाभ देण्यात येतो.SC,NT,OBC,OPEN,अशा सर्व समाजापर्यंत योंजना पोचवण्यासाठी कंपनी प्रयत्न करत आहे.तळागाळातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचण्यासाठी कंपनी सतत प्रयत्न करत आहे.बियाने वाटपासाठी कंपनीच्या डायरेक्टर रंजना कदम, दिलिप कदम, पत्रकार योगराज पांचाळ उपस्थित होते
ग्रामीण भागातील महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने स्वयंसिद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपणी शेतकरी महिला आणि शासकिय अधिकारी यांच्यातील दुवा म्हणून काम करत आहे.शेंन्द्रीय शेती प्रोत्साहन आणि मार्गदर्शन,महिला उद्योजक घडवने,महिलांचे आरोग्य वेगवेगळ्या विषयांवर कंपनी सतत काम करत असते.कळंब तालुक्यातील 2000 महिलांचे संघटन या कंपनीच्या माध्यमातून करण्यात आले आहे.
कंपनीच्या माध्यमातून क्रषी विभाग कळंब तालुका कृषी अधिकारी भागवत सरडे साहेब यांनी ज्वारी बियाणे,तुर बियाणे, सोयाबीन बियाणे, वेगवेगळ्या निविष्ठा वाटप वाटप केल्या आहेत.क्रषी विभागातील सर्व अधिकारी सहकारी यांचा चांगला प्रतिसाद आणि सहकार्य मिळत आहे.त्यामुळे शेतकरी महिला यांच्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे.
स्वयंसिद्ध शेतकरी प्रोड्युसर कंपणीचे डायरेक्टर महिलांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत.महिला सक्षमीकरणाचे ध्येय घेऊन हि कंपनी काम करत आहे.पंचायच समितीचे गट विकास अधिकारी विनोद जाधव,तहशिलदार हेमंत ढोकले यांचे देखिल मोलाचे सहकार्य या कंपनीला मिळत आहे.

Post a Comment
0 Comments