हैद्राबाद गॅझेटला मान्यता दहिफळमध्ये जल्लोष
दहिफळ प्रतिनिधी-कळंब तालक्यातील दहिफळ येथील मराठा आरक्षणाच्या लढ्यात मराठा सेवक आझाद मैदानात सहभागी झाले होते. दि.२९ ऑगस्ट २०२५ रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आरक्षणासाठी आंदोलन सुरु झाले.
आमरण उपोषणासाठी मनोज जरांगे पाटील आझाद मैदाणावर बसले होते.त्यांना पाठिंबा देण्यासाठी मराठवाड्यातील लाखो मराठा समाज मुंबईत जमला होता.पाच दिवसांच्या उपोषणानंतर अखेर महाराष्ट्र सरकारने हैद्राबाद गॅझेटला मान्यता दिली मराठा उपसमिती मंडळाचे राधाकृष्ण विके पाटील यांच्या शिष्टमंडळाने जरांगे पाटील यांची भेट घेऊन हैद्राबाद गॅझेट मान्यता असलेली कागदे देण्यात आली.जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेतले.मागण्या मान्य झाल्याचे पाहून एकच जल्लोष करण्यात आला.मुंबईला गेलेल्या मराठा सेवकांचा गावात भव्य सत्कार करून भव्य मिरणवूक काढण्यात आली.फटाक्यांची अताशबाजी ,गुलाल उधळून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments