उमरा येथे ८ वा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
उमरा प्रतिनिधी- तालुक्यातील उमरा येथील अंगणवाडी क्रमांक 917 विभाग येरमाळा येथे आठवा राष्ट्रीय पोषण माह कार्यक्रम येरमाळा विभाग प्रमुख श्रीमती. बोरफळकर मॅडम यांच्या मार्गदर्शना खाली मोठ्या उत्साहात पार पडला. त्यांच्या मार्गदर्शनामुळे महिलांना संतुलित आहार बालकांचे संगोपन गर्भवती व स्तनदा मातांचे पोषण, किशोरी मुलींना योग्य आहार या विषयाची सखोल माहिती मिळाली
या कार्यक्रमात अंगणवाडी कार्यकर्ते ,आशा कार्यकर्ती तसेच गावातील महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.
कार्यक्रमाची प्रस्तावना जिल्हा परीषद शिक्षिका श्रीमती. कवडे मॅडम यांनी केली तर आभार अंगणवाडी कार्यकर्ती श्रीमती. दिपाली जाधव यांनी केले
या कार्यक्रमात स्थानिक अन्न धान्यापासून पोष्टिक आहार तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महिलांनी उत्साहाने सहभाग घेत विविध प्रश्न विचारले व अनुभव मांडले.
कार्यक्रमाचे आयोजन श्रीमती दिपाली जाधव यांनी केले.
"निरोगी कुटुंब हेच समृद्ध समाजाचा पाया" हा संदेश देत पोषण माह कार्यक्रमाची सांगता झाली.

Post a Comment
0 Comments