Type Here to Get Search Results !

ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना सुवर्ण संधी


ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षणाच्या माध्यमातून युवकांना सुवर्ण संधी

[भारतीय स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे प्रवेश सुरु]

धाराशिव प्रतिनिधी- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील बेरोजगार,होतकरू तरूण युवकासाठी भारतीय स्टेट बॅंक च्या माध्यमातून ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था धाराशिव येथे सुरु करण्यात आली आहे.

          आरसेटीच्या द्वारा प्रायोजित अनेक प्रशिक्षण कार्यक्रमामधून कोणतेही एक प्रशिक्षण घेवून आपण आपला स्वत:चा रोजगार ,नोकरी /उद्योग सुरू करू शकता.प्रशिक्षण मोफत निशुल्क आहे.संस्थेतर्फे सर्व सुविधा उपलब्ध आहेत.

   संपुर्ण प्रशिक्षण मोफत,निवाशी राहण्याची,नास्ता,चहा,

भोजनाची उत्तम सोय आहे.तसेच अनुभवी प्रशिक्षकांचे मार्गदर्शन मिळते. 

अद्ययावत तांत्रिक ज्ञान,भरपुर प्रात्यक्षिके,सराव उद्योजकीय गुणवत्त प्रशिक्षण,बॅंक व्यवहार व रोखरहित व्यवहार संबधीचे मार्गदर्शन ,प्रकल्प अहवाल,मुद्रा लोन इत्यादी सुविधा आहेत.

दुग्ध व्यवसाय,वर्मी कंपोस्ट तयार करणे,कुकूट पालन,शेळी पालन,सुक्ष्म उद्योजकांसाठी उद्योजक विकास कार्यक्रम,फोटोग्राफी,व्हिडीओग्राफी,मोबाईल दुरूस्ती,ब्युटी पार्लर,पेपर कव्हर,लिफाफा,फाईल तयार करणे,पापड,लोणचे,मसाला पावडर बनविणे,टेलरिंग (महिला वर्ग) ,बॅंक मित्र उद्योजक विकास कार्यक्रम ,टू व्हिलर मेकॅनिक,फास्ट फुड स्टाॅल, उद्यमी ,आर्टिफिशल ज्वेलरी शोभेच्या वस्तू बनविणे,रेशीम कोष उत्पादक उद्यमी,घेरलू उद्योग उपकरण सेवा उद्यमी,युपीअस व बॅटरी दुरूस्ती,सीसीटिव्ही कॅमेरा दुरूस्ती,वस्त्र चित्रकला उद्यमी (आरी वर्क) एकुण २० कोर्स शिकवले जातात.

प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे -ओळखपत्र-आधारकार्ड,मतदान कार्ड,ड्रायव्हर लायसन,पॅनकार्ड,पासपोर्ट फोटो चार प्रती,

शाळा सोडल्याचा दाखला,राशनकार्ड,बचतगटामध्ये असल्याचे प्रमाणपत्र.

अर्ज करण्याचा पत्ता:-भारतीय स्टेट बॅंक ग्रामीण स्वयंरोजगार प्रशिक्षण संस्था,धाराशिव.सधन कुकूटपालन कॅम्पस् रामनगर ,जाॅनी हाॅटेल जवळ.

धाराशिव-४१३५०१

 मो.नं. 9156726777 

अवधुत पौळ सर



 


Post a Comment

0 Comments