भोसा येथील घटना : दारुच्या नशेत सोयाबीनचे बुचाड दिले पेटवून लाखोंचे नुकसान.
दहिफळ प्रतिनिधी-कळंब तालकुक्यातील भोसा गावातील हिंमत कांबळे या शेतकऱ्याच्या सोयाबीनचे बुचाड गावातील भावकीतल्या दारुड्याने दारुच्या नशेत सोयाबीनचे बुचाड पेडवून दिले.सगळे सोयाबीन जळून खाक झाले आहे.
गट नं.१६२ ५एकर ६ गुंठेतील सोयाबीन काढून शेतात बुचाड(होंडी)लावलेली होती. गंगुबाई दशरथ कांबळे त्यांची दोन मुले हिम्मत,संतोष ,सुना,नातवंडे घरी झोपलेले होते.
दि.१४ आक्टोंबर रोजी गावातील अनिल बापु ताकपिरे व विकास शांतीलाल कांबळे गेले. दारूच्या नशेत दोघे असल्याचे गंगुबाई दशरथ कांबळे यांनी सांगितले.अनिल ताकपिरे यांनी विकास कांबळे याने शेतात जावून सोयाबीन पेटवले असल्याचे सांगितले.सदरील घटनेची माहिती मिळताच ग्राम महसुल अधिकारी गोरे यांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला आहे.
येरमाळा पोलिस स्टेशन येथे फिर्यादी गंगुबाई दशरथ कांबळे यांच्या सांगण्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पाच एकर ६ गुंटे मधील सोयाबीनचे एक लाख २५हजार रू नुकसान झाले आहे.संबंधीत व्यक्तीवर कडक कार्यवाही करा झालेले नुकसान भरपाई द्यावी असे मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments