Type Here to Get Search Results !

प्रसिद्धीसाठी वेळ तरी बघा...?

 प्रसिद्धीसाठी वेळ तरी बघा...?

खासदार मेधा कुलकर्णी यांना धार्मिक प्रसिद्धीसाठी सणासुदीच्या काळात हिंदू-मुस्लिम वाद लावण्याचे कारण काय? दिवाळीत लोक आनंदत आहेत, तुमचं काय चाललंय! यामागे कुठलं तरी मोठं षडयंत्र आहे असं वाटतं. तशाही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अर्थात *'मनपा'* निवडणुका असल्यामुळे आपण कसे कार्य तत्पर आहोत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न दिसतोय. मात्र शनिवार वाड्यात ज्यांनी नमाज पठण केलं त्यांना पोलीस, मनपा कर्मचारी, संबंधित पुरातत्व विभाग किंवा ज्यांच्याकडे कायदा सुव्यवस्थेच्या गोष्टी आहेत. त्यांनी का लक्ष दिलं नाही हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. कुणी कुठे काय करावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे हे कळत नाही का.? फुकट प्रसिद्धीसाठी चालवलेली ही धावपळ दिसते आहे हेच यावरून लक्षात येतं...

खासदारांनी पुण्याचे भयंकर प्रश्न हे मांडले पाहिजेत यासाठी आंदोलन का होत? 

वेळ पडली तर पुण्याच्या खासदारांना पुण्यातल्या प्रश्नाची एक यादी आम्ही सुपूर्द करू...? मग करा त्यावर आंदोलन, आम्ही वाट पाहतोय...

- संतोष शिंदे,

प्रदेश प्रवक्ता, संभाजी ब्रिगेड, महाराष्ट्र

Post a Comment

0 Comments