Type Here to Get Search Results !

ॲड. अमोल पाटील नंदगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक

 

ॲड. अमोल पाटील नंदगाव जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) पक्षाकडून निवडणूक लढविण्यास इच्छुक

 . 











 

अँड.अमोल पाटील हे एम.एस्सी. बी.एड.सह कायद्याचे पदवीधर असून त्याना सामाजिक व राजकीय कार्याची आवड आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वक्ता सेल च्या माध्यमातून त्यानी धाराशिव जिल्ह्यातच नव्हे तर राज्यभर नामदार शरद पवार यांच्या नेतत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रचार आणि प्रसार करीत आहेत. एकनिष्ठेने पक्षाच्या वतीने त्यांनी जिल्हात अनेक उपक्रम राबवितात. वागदरी येथे शिव बसव राणा व काशीबा महाराज जन्मोत्सव समितीच्या वतीने शिवजयंतीच्या निमित्ताने सर्व ग्रामस्थांना सोबत घेऊन शिवशाही सप्ताहाचे आयोजन करून रक्तदान शिबिर महिला सक्षमीकरणाचे कार्यक्रम, युवकासाठी कार्यक्रम, विद्यार्थ्यांसाठी कार्यक्रम अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन शिव सप्ताहाच्या माध्यमातून करण्यास त्यांनी गेल्या दहा वर्षापासून सुरुवात केली आहे. त्यांना सामाजिक आणि राजकीय कार्याची मोठी आवड आहे त्यांनी आपला शेती हा मुख्य व्यवसाय सांभाळून समाजकार्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे.

त्यानी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये स्वतःची ओळख निर्माण केली आहे.

सामाजिक क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्याना अनेक पुरस्कार मिळाले आहेत.वेगवेगळ्या सामाजिक चळवळीतील संघटनामधील पदावर ते कार्यरत आहेत.त्यांचा पक्षातील राज्य पातळीवरील नेत्यांबरोबर थेट संपर्क आहे.आमदार रोहित दादा पवारांनी काढलेल्या युवा संघर्ष यात्रेमध्ये पुणे ते नागपूर ८०० किलोमीटरचा पायी प्रवास करून पक्षाची भूमिका जनमाणसात रुजविण्याचे काम त्यानी केले आहे. पवार कुटूंबात एक विश्वासाचे नाते त्यांनी निर्माण केले आहे.

नंदगाव जि.प. गट हा सर्वसाधारण (खुला) प्रवर्गासाठी राखीव असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जर पक्षाच्या नेत्यांनी त्याना संधी दिली तर नंदगाव जिल्हा परिषद गटाचा चेहरा मोहरा बदलनार असा निर्धार त्यानी केला आहे.

तळागाळातील जनतेला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अग्रेसर राहणार असल्याचा संकल्प त्यानी केला आहे.शिव शाहू फुले आंबेडकरांच्या पुरोगामी विचारांचे ते पाईक आहेत.

शिवसेना, काँग्रेस, पक्षाच्या जिल्हा तालुका पातळीवरील नेत्या सोबत त्यांचे चांगले संबंध आहेत.ग्रामीण भागातील प्रत्येक गावामध्ये त्यांचा चांगला जनसंपर्क आहे.महाविकास आघाडीचा सर्व समावेशक नवा चेहरा त्यांच्या उमेदवारीमुळे जनतेला मिळणार आहे.

महाविकास आघाडीने अमोल पाटील सारख्या युवा तरुण तडफदार अभ्यासू व्यक्तीला जिल्हा परिषद मध्ये जाण्याची संधी दिली तर नक्कीच याचा फायदा ग्रामीण भागातील जनतेला होईल.

अमोल पाटलांच्या उमेदवारीमुळे नांदगाव जिल्हा परिषद गटामध्ये मोठी चुरस निर्माण होणार अशी राजकीय वर्तळात चर्चा आहे.

Post a Comment

0 Comments