Type Here to Get Search Results !

एम बी बी एस वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल जनहित परिवाराच्या वतीने सत्कार


एम बी बी एस वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल जनहित परिवाराच्या वतीने सत्कार

येरमाळा प्रतिनिधी-(नितेश बारकुल)

कळंब तालुक्यातील येरमाळा येथील दिग्वीजय जयश्री धनजंय बारकुल , धनश्री जयश्री धनंजय बारकुल यांची एम बी बी एस वैद्यकीयात शिक्षणासाठी निवड झाली आहे.

पालक धनंजय बारकुल ज्ञानद्योग विद्यालय येरमाळा येथे लॅबलरीयन आहेत.धनंजय बारकुल यांची हे दोन्ही मुलं आहेत.

एकाच कुटुंबातील दोन मुलं एम बी बी एस या वैद्यकीय शिक्षणासाठी निवड झाल्याबद्दल आई वडील व दोन्ही मुलांचा सत्कार जनहित परिवाराकडून करण्यात आला आहे.

अटल बिहारी वैद्यकीय महाविद्यालय पुणे येथे धनश्री बारकुल ची निवड झाली आहे.तसेच सोलापुर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दिग्विजय बारकुलची निवड झाली आहे. 

सन्मान सोहळ्यानिमित जनहीत परिवाराचे संस्थापक अध्यक्ष संतोष तौर पालक धनंजय बारकुल ,जयश्री बारकुल , अभिजित पाटील दत्ता बारकुल, जिवन

जाधव ,समाधान भगत उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments