एस.बी.आय.च्या येडशी शाखेकडून जनता विद्यालयात ५० सायकलींचे वाटप.
येडशी प्रतिनिधी-(महेश पवार)
येडशी येथील जनता विद्यालयात एस.बी.आय.च्या विशेष फंडातून गरजू विद्यार्थ्यीनींना ५० सायकलींचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी बॅंकेचे क्षेत्रीय अधिकारी सुरेशबाबु उदयगिरी येडशी शाखेचे शाखा व्यवस्थापक श्री निलेश बोंबले,सहशाखा व्यवस्थापक श्री तुषार कदम यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य चंद्रकांत नलावडे होते.
विद्यालयातील गरजवंत विद्यार्थ्यांना शिक्षणात हातभार लागावा याचे सामाजिक भान ठेवून बँकेच्या वतीने त्यांच्याकडे असलेल्या सीआरएस फंडातून ५० सायकलीचे वितरण करण्यात आले. येडशी व परिसरातून शाळेत येणाऱ्या मुलींचे प्रमाण लक्षणीय आहे त्यांना शाळेत ये -जा करण्यासाठी गैरसोय होऊ नये या हेतूने बँकेने सदर विद्यार्थ्यांना या माध्यमातून शैक्षणिक मदत केली आहे. त्याचे वितरण आज विद्यालयात पार पडले या प्रसंगी बँकेकडून गरजवंत महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले.
विद्यालयाचे उपप्राचार्य श्री कांबळे सर व पर्यवेक्षिका श्रीमती नाईकनवरे मॅडम यांची व्यासपीठावरती उपस्थिती होती. त्याचबरोबर कार्यक्रमासाठी विद्यालयाच्या सर्व विभागातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, वडगाव येथील महिला बचत गटांच्या महिला उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद जाधव यांनी केले.

Post a Comment
0 Comments