गौर येथे शाळेच्या इमारतीजवळ दारुच्या बाटल्यांचा खच...तळीरामाचा हैदोस....!
दहिफळ प्रतिनिधी-
कळंब तालुक्यातील गौर येथील जि प शाळेच्या परिसरात दारुच्या बाटलीचा खच पडला आहे. शाळेच्या जवळच मद्य विक्री खुलेआम केली जात आहे. तळीरामांची बैठक शाळेच्या भोवती असते. त्यामुळे इमारतीच्या कडेलाच बाटल्यांचा खच पडलेला आहे. याबाबत पोलिस स्टेशनकडे तक्रार केली आहे तरी देखील मद्यपान करणारे बाटल्या टाकत आहेत. ग्रामपंचायतच्या सरपंच सदस्यांनी स्वत:बाटल्या गोळा करून परिसर स्वच्छ केला आहे.
विद्या मंदिर शेजारी असे प्रकार घडत असतील तर विद्यार्थ्यांनी आदर्श काय घ्यावा. वेळीच लगाम बसणे गरजेचे आहे. आदर्श शाळा आहे .गावात नोकरदार वर्ग मोठा आहे.गावात शैक्षणिक वातावरण आहे. मराठवाडा मुक्तीसंग्रामात सात हुतात्मे झाले. शाळेपासुन काही अंतरावर भव्य हुतात्मा स्मारक आहे. त्याचे पावित्र्य जपले पाहिजे.

Post a Comment
0 Comments