Type Here to Get Search Results !

येडेश्वरी नगरीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी

 


येडेश्वरी नगरीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त भाविकांची मोठी गर्दी

येरमाळा प्रतिनिधी – 

तुळजाभवानीची धाकटी बहीण म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या आई येडशेरीच्या येरमाळा नगरीत कोजागिरी पौर्णिमेनिमित्त श्री येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आज लाखो भाविकांनी येडेश्वरी नगरीत मोठ्या उत्साहात हजेरी लावली. "आई राजा उदो उदो" या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. सोमवार पासूनच दोन पौर्णिमा असल्यामुळे  दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या.

देवीच्या मंदिर परिसरात दिव्यांची रोषणाई, भजनी मंडळांचे कार्यक्रम येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट कडून भाविकांसाठी महाप्रसादाची सोय करण्यात आली होती तसेच आलेल्या भाविकातून ही ठिकठिकाणी प्रसाद वाटप केला जात होता, यामुळे येडेश्वरी मंदिर परिसरात वातावरण भक्तिमय झाले होते. येडेश्वरी देवस्थान ट्रस्ट प्रशासन व स्वयंसेवकांनी दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सोयीसाठी येडेश्वरी मंदिरावर योग्य व्यवस्था केली होती.

कोजागिरी पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर देवीच्या दर्शनाने सर्वत्र श्रद्धा, भक्ती आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले. पौर्णिमे दिवशी सायंकाळी छबिना मिरवणूक होते 

मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याचे काम खोळंबल्यामुळे येणाऱ्या भाविकांची तसेच वाहनधारकांची रस्त्या भावी तारांबळ होत होती तसेच रिक्षा चालकांना ही कसरत करत रस्त्यातून मार्ग काढावा लागत होता.

Post a Comment

0 Comments