दहिफळ प्रतिनिधी-कळंब तालुक्यातील दहिफळ परिसरात मुसळधार पाऊस झाला. तेरणा नदीने पात्र सोडलं शेतात पुराचे पाणी शिरल्याने सगळं सोयाबीन पीक पाण्यात गेले. शेतात बघावे तिकडे पाणीच पाणी दिसत होते.
शेतात तळ्याचे स्वरुप आले होते.कधी नव्हे ते तेरणा नदी पात्राने वळण घेतले.चारशे फुट अंतरावर पाणी शिरले.यात सोयाबीन पीक पुर्ण पाण्यात गेले.परंतु अनेकांच्या शेतातील माती वाहून गेली आहे.
प्रचंड नुकसान झाले आहे.
काही शेतकऱ्यांनी सोयाबीन काढुन बुचाड लावले होते. अचानक आलेल्या पुरात बुचाड वाहून गेले आहे.तसेच सापनाई येथील एका शेतकऱ्याची गाय वाहून गेली. तलाठी,ग्रामसेवक,डाॅक्टरांनी पंचनामा केला आहे. तेरणानदीकाठच्या शेतात प्रचंड नुकसान झाले आहे. दहिफळ ,सापनाई,शेलगाव ,संजितपुर,गौर,वाघोली,अवधूतवाडी,
भोसा,बारातेवाडी,बाभळगाव परिसरात जोरदार मुसळधार पाऊस पडला.
या मार्गा वरील वाहतुक सेवा ठप्प झाली होती. बार्शी,ढोकी,पुणे,लातूर,धाराशिवकडे जाणाऱ्या बस नदीच्या पुरामुळे एका जागे उभा होत्या.दि.६ ऑक्टोंबर रोजी खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुरग्रस्त भागाची पाहणी केली .तलाठी,ग्रामसेवक,सरकारी कर्मचाऱ्यांना नुकसानीचा पंचनामा करण्याचे निर्देश दिले.वरिष्ठ पातळीवर मी पाठपुरावा करतो.शेतकऱ्यांना भरीव मदत कशी देता येईल त्यासाठी मी दिल्ली दरबारी मागणी करणार आहे.कुणी शेतकऱ्यांनी खचून जाऊ नये.नैराश्यातून कोणी टोकाचे पाऊल उचलू नये.लेकराबाळाचा विचार करा.संकटाला धैर्याने तोंड द्या आम्ही आहोत सोबत.असा शेतकऱ्यांना धिर दिला.यावेळी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

Post a Comment
0 Comments