धार्मिक,सांस्कृतीक कार्यक्रमाने दहिफळच्या खंडोबा यात्रेची सांगता झाली.
पंचक्रोशीतील मोठी यात्रा म्हणुन या यात्रेचा नावलौकीक आहे.पाच दिवस देवाचा छबीना काढला जातो.नागदिव्याच्या दिवशी मोठा छबीना असतो.चंपाषष्ठीच्या दिवशी मुख्य यात्रेला सुरुवात झाली.
सकाळी राजे ग्रुपने वाजत गाजत देवाला नैवद्य दाखवला व महाप्रसाद वाटपाला सुरूवात केली.१५ वर्षापासुन राजे ग्रुप महाप्रसादाचे वाटप करते.
बाहेर गावाहून आलेल्या यात्रेकरूंना महाप्रसादाचा आस्वाद घेता येतो.गावातील प्रत्येक घरात महाप्रसाद घेतला जातो.
यात्रेतील हा एक वेगळा कौतुकास्पद उपक्रम आहे.
यंदा गावातील ५३ लोकांनी एकत्र येऊन लेझीम पथक तयार केले.एक सारखी ड्रेसिंग,डोक्यावर फेटा,ढोल,ताशा,झांद,हालगीच्या तालावर नाचत यात्रेची शोभा वाढवली.
वारुवाले मंडळी ,देवाची काटीवाले यांच्यामुळे नैवद्य कार्यक्रम,लंगर मिरवणुक पार पडतो.
डेजेच्या आवाजाने कान भदीर झाले.चार ट्रेक्टरच्या टेलरवर नृत्यांगना नाचत होत्या.७०टक्के यात्रेकरू तिकडे गुंग झाले होते.मानाच्या नैवद्याचा कार्यक्रम संपन्न झाला.
नंतर लंगर मिरणवुकीला सुरुवात झाली.जवळपास तीन तास लंगर मिरवणुक झाली.मंदिरासमोर दोन्ही लंगर तोडण्याचा कार्यक्रम संपन्न झाला.लंगराचे मानकरी श्रीकांत धोंगडे ,सज्जन कोठावळे यांनी एकाच वेळी एका हिसक्यात लोखंडी लंगर तोडला.भाविकांनी यळकोट यळकोट घे मल्हारचा गजर करत भांडार,खोबरे उधळले.
यावेळी हजारो भाविकांची गर्दी उसळली होती.परिसर कसा फुलून गेला होता.
लंगर तुटल्यानंतर पुढील कार्यक्रम गाडा बगाड मिरवणुकीचा असतो.गाडा बगाड म्हणजेच देवाचा रथ .हा रथ संपुर्ण लाकडी आहे.कुठेच लोखंड वापरले जात नाही.आख,आखरी,दांडी,खांब,जु,खीळ,कुणी,पाळणा
लाकडापासुन तयार करतात.खांब उभा करण्यासाठी दगडी चाक बांधले जाते.तर गाडा चालवण्यासाठी दोन दगडी चाके बसवली जातात.मराठवाड्यातील एकमेव दहिफळचा गाडा बगाडा आहे.सहा बैलजोडीच्या सहाय्यने गाडा बगाडा ओढला जातो.गाडा बगाडावर घंटी वाजवणारा,काही मानाचे वारूवाले,पाळणा वरखाली होऊ नये म्हणुन पाठीमागे एक व्यक्ती बसवला जातो.
मंदिराला पाच प्रदक्षिणा घातल्या जातात.
रात्री सांस्कृतीक कार्यकम असतो.यंदा भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
यात्रेच्या दुसऱ्या दिवशी सोंगाचा कार्यक्रम झाला .बाहेरचे आघोरी सोंग आनण्यात आले होते.गावातील परंपरा जपन्यासाठी कलाकारांनी विविध सोंगे नटवली होती.शाळेतील मुलांनी सहभाग घेतला.तसेच काही कलाकारांनी लोकनृत्य सादर करत बंजारा सोंग गाजवले.
यात्रेच्या तिसऱ्या दिवशी मर्दानी खेळ कुस्त्यांचा कार्यक्रम संपन्न झाला.धाराशिव,येडशी,सापनाई,शेलगाव,रुई पारगाव ,शिराढोण,गौर सह इतर भागातून मल्लांनी सहभाग नोंदवला.१०० रुपयापासुन पाच हजार सात हजार,शेवटची निकाली कुस्ती ११ हजार रुपये पर्यंत बक्षीस देण्यात आले.शेकडो मल्लांनी लाल मातीत मल्लविद्येचे प्रदर्शन केले.गौर येथील लखन लंगडे व शिराढोण येथील विजय ठोंबरे यांच्यात लढत झाली.
लखन लंगडेने शिताफिने डाव टाकत बाजी मारली.
शेवटची निकाली कुस्ती जिंकली.
धार्मिक,सांस्कृतीक कार्यक्रमाने सुरूवात झाली तर मर्दांनी खेळाने यात्रेची सांगता झाली.
यात्रेत खेळण्याची दुकाणे मोठ्या प्रमाणात आली होती.तसेच लहान मुला मुलीसाठी झंपींग जाळी ,घसरगुंडी फुगा,रहाट पाळणा मुळे यात्रेला मोठे स्वरूप आले.मंदिर परिसरात हार फुल,नारळ,प्रसादाची दुकाने थाटली होती.
यात्रा शाततेत पार पाडण्यासाठी येरमाळा पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी उपस्थीत होते.यात्रा कमीटीने परिश्रम घेतले.तसेच यात्रेला प्रसिध्दी पत्रकार बांधवांनी विविध दैनिक,साप्ताहीक,पोर्टल,युट्युब चॅनलवर दिली.
खंडोबा यात्रा गावातील लोकांकडुन वर्गणी गोळा करून केली जाते.देवस्थानला तिर्थक्षेत्राचा क दर्जा मिळाला आहे.लवकरच तिर्थक्षेत्राचा विकास होईल यंदाच्या तुलनेत पुढच्या वर्षी यात्रेला स्वरूप येईल....
-योगराज पांचाळ दहिफळकर.

Post a Comment
0 Comments