कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या जयंतीनिमित्त विविध स्पर्धा जनता विद्यालय येडशी येथे संपन्न
येडशी प्रतीनिधी- महेश पवार
जनता विद्यालय येडशी येथे कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे यांच्या 123 व्या जयंतीच्या निमित्ताने उच्च माध्यमिक गटाच्या विविध स्पर्धा दिनांक 27 नोव्हेंबर रोजी पार पडल्या. उद्घाटन प्रसंगी बार्शीतील प्रख्यात डॉ. संदीप तांबारे, युवा उद्योजक तानाजी जाधव श्री साई कॉम्प्युटरचे संचालक श्रीमंत नवले हे उपस्थित होते तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी येडशीच्या सरपंच डॉ. सोनिया पवार ह्या होत्या.
येडशी च्या जनता विद्यालयात उच्च माध्यमिक गटाच्या निबंध, वक्तृत्व, हस्ताक्षर, चित्रकला, रांगोळी समूह गीत गायन व वैयक्तिक गीत गायन इत्यादी स्पर्धा पार पडल्या. याचा बक्षीस वितरण समारंभ ही स्पर्धे दिवशीच संध्याकाळी संपन्न झाला याप्रसंगी येडशीच्या सरपंच डॉ. सोनिया पवार माजी सरपंच हे हेमंत बापू सस्ते, प्रख्यात मल्ल सुनील शेळके अर्जुन शेळके केंद्रप्रमुख येडशी श्री महेश अनपट सर यांची उपस्थिती होती या स्पर्धेत पुढील प्रमाणे विद्यार्थ्यांना पारितोषिक मिळाली.
*निबंध स्पर्धा* -प्रथम क्रमांक रोहिणी खुणे (श्री शिवाजी महाविद्यालय, बार्शी ) द्वितीय क्रमांक अर्पिता खरात (महाराष्ट्र विद्यालय, बार्शी) तृतीय क्रमांक स्नेहा यादव (महाराष्ट्र विद्यालय, बार्शी) उत्तेजनार्थ आरती मोरे (शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय, बार्शी)
*वक्तृत्व स्पर्धा* प्रथम क्रमांक कलाश्री पवार (शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय, बार्शी) द्वितीय क्रमांक रोहन भंडारे (शिवाजी महाविद्यालय, बार्शी) तृतीय क्रमांक वैष्णवी काटे (जनता विद्यालय येडशी) उत्तेजनार्थ क्रमांक दीक्षा ताटे (संत तुकाराम विद्यालय पानगाव)
*हस्ताक्षर स्पर्धा* प्रथम क्रमांक श्रुतिका शिंदे (जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, येडशी) द्वितीय क्रमांक अर्पिता खरात (महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बार्शी) तृतीय क्रमांक नवेली निकाळजे (जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कसबे तडवळे) उत्तेजनार्थ अंकिता देशमुख (श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी)
*रांगोळी स्पर्धा* प्रथम क्रमांक वैष्णवी घोडके (कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी) द्वितीय क्रमांक वैभवी फोपले (श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी) तृतीय क्रमांक सानिया शेख (जयहिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कसबे तडवळे) उत्तेजनार्थ श्रावणी कोळी (बी. पी. सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी)
*चित्रकला स्पर्धा* प्रथम क्रमांक सानिया शेख (जय हिंद माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कसबे तडवळे) द्वितीय क्रमांक सिमरन शिकलकर (कर्मवीर डॉ मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी) तृतीय क्रमांक नम्रता शिनगारे (जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येडशी) उत्तेजनार्थ वैष्णवी सगरे (संत तुकाराम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय पानगाव)
*वैयक्तिक गीत गायन स्पर्धा* प्रथम क्रमांक क्रांती तवले जनता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येडशी द्वितीय क्रमांक कृष्णा माने, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी तृतीय क्रमांक रमता गाढवे बीपी सुलाखे कॉमर्स कॉलेज बार्शी उत्तेजनार्थ सुरज रामगुडे महात्मा गांधी विद्यालय काटेगाव *समूह गीत गायन स्पर्धा* प्रथम क्रमांक- माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय येडशी द्वितीय क्रमांक - श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी तृतीय -क्रमांक कर्मवीर डॉक्टर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी उत्तेजनार्थ- शंकरराव निंबाळकर अध्यापक विद्यालय बार्शी
या स्पर्धेचे परीक्षण श्रीमती लवटे मॅडम, लाड सर,शशिकांत लांडगे सर, भूषण देवकर, शंकर लाखे, जाधव सर, थोडसरे मॅडम, नंदकुमार खोत सर, मुळीक मॅडम यांनी केले.
सर्व स्पर्धा पार पाडण्यासाठी प्राचार्य चंद्रकांत नलावडे, उपप्राचार्य कांबळे सर, पर्यवेक्षिका श्रीमती नाईक नवरे मॅडम, स्पर्धा प्रमुख व विज्ञान विभाग प्रमुख श्रीमती जमाले मॅडम कला विभाग प्रमुख श्रीमती देशमुख मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच संपूर्ण स्पर्धा पार पाडण्यासाठी विद्यालयातील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री प्रमोद जाधव यांनी केले तर आभार श्रीमती महानंदा बनसोडे यांनी मानले.

Post a Comment
0 Comments