मलकापूर येथे दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व सिद्ध सुभाष बाप्पा ग्रंथ पारायण सोहळा
येरमाळा प्रतिनिधी -
येरमाळा ता कळंब मलकापूर पंचक्रोशीतील भक्तांसाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री क्षेत्र दत्त मंदिर संस्थान, मलकापूर (ता. कळंब, जि. धाराशिव) येथे दत्त जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. यंदाचे हे ४३ वे वर्ष असून यामध्ये सिद्ध सुभाष बाप्पा ग्रंथ पारायण, हरिनाम सप्ताह, कीर्तन सेवा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांचा समावेश असून याचा दत्तभक्तांनी व नागरिकांनी लाभ घ्यावा तसेच कार्यक्रमानिमित्त परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
दिनांक २८ नोव्हेंबर २०२५ ते ४ डिसेंबर २०२५ या कालावधी हा सप्ताह पार पडणार आहे परंपरेप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात मिरवणुकीने होत असून दररोज प्रतिष्ठित कीर्तनकारांकडून कीर्तन सेवा घेण्यात येणार आहे.
सप्ताहात भजन, हरिनाम जप, धार्मिक प्रवचने, रथसेवा, तसेच सिद्ध सुभाष बाप्पा ग्रंथाचे पारायण असे विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. सकाळी ७ ते १० आणि दुपारी ५ ते ६ या वेळेत हरिपाठ ७ ते ८ भोजन ९ ते ११ किर्तन होणार आहे. दि २८ रोजी हभप किरण ताकमोगे महाराज सापनाई, दि २९ रोजी हभप माधव महाराज बोधले गौर, दि ३० हभप उत्तरेश्वर महाराज लोखंडे पानगाव, दि ०१ हभप पापा महाराज बोबडे वडाचीवाडी, दि ०२ हभप वैजनाथ ऊस्तुरे महाराज औसा, दि ०३ हभप विलास महाराज मुळे जुनोनी, दी ०४ रोजी हभप नाना महाराज कदम नेकनूर यांची कीर्तन सेवा होणार आहे
कार्यक्रमाचे नियोजन श्री दत्त मंदिर समितीमार्फत करण्यात आले असून अध्यक्ष ह.भ.प. एकनाथ महाराज लोमटे यांनी भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन केले आहे. गावातील व परिसरातील नागरिक, सेवक भाविकांच्या सहकार्याने सप्ताहाची तयारी पूर्ण झाली आहे.
तसेच श्री क्षेत्र मलकापूर ते गाणगापूर पायी दिंडी सोहळा निघणारा सून दिंडी सोहळ्याचे हे २७ वे वर्ष आहे पायी दिंडी सोहळ्याचे नेतृत्व व नियोजन प्रति वर्षाप्रमाणे हभप राष्ट्रसंत एकनाथ महाराज लोमटे यांच्या मार्गदर्शनाखाली होत असते.

Post a Comment
0 Comments