पाच आयएएस अधिकारी गौर गावात मुक्कामी
गौर प्रतिनिधी - डॉक्टर एम सी आर मानव संसाधन संस्था तेलंगणा येथील पाच आयएएस अधिकारी गौरच्या मुक्कामी अभ्यास दौऱ्यावर पाच दिवसांचा दौरा भारतीय प्रशासन सेवेतील अधिकाऱ्यांना ग्रामीण जीवनाची सामाजिक आर्थिक शैक्षणिक आरोग्य विषयक लघुउद्योग स्वयंरोजगार योजना मनरेगा अंतर्गत कामे तसेच विविध लाभांच्या योजना या सर्वांचा अभ्यास करून आवश्यक असणाऱ्या गरजा शासकीय योजनांच्या लाभांचा परिणाम सकारात्मक किती झाला आणि आणखी काय गरजेचे आहे याचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी व भावी आयुष्यात प्रशासनामध्ये वाटचाल करण्यासाठी होणार आहे सर्व योजनांची ग्रामपातळीवर होणाऱ्या अंमलबजावणी आणि ग्रामपंचायत सारख्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी लाभार्थ्यांना पोहोचवलेल्या योजना याची प्रचिती घेण्यासाठी मुक्कामी राहून सर्वांकष बाबींचा अभ्यास करत आहेत या अभ्यास दौऱ्यासाठी डॉक्टर एम सी आर मानव संसाधन संस्था तेलंगणा येथून वटीकुटी भावया यादव कार्तिका जसविंदर पालसिंग अर्पित चौधरी येथील शर्मा या पाच आयएएस अधिकाऱ्यांना गौर येथे अभ्यास दौऱ्यासाठी पाठवण्यात आले आहे
एकाच वेळी पाच आहेस अधिकारी अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने गौर सारख्या खेडेगावात आले असून गौरवासीयांनी त्यांचे जल्लोसात स्वागत केले यावेळी सरपंच सुषमा धनंजय देशमुख उपसरपंच रामेश्वरी निवृत्ती लंगडे ग्रामपंचायत अधिकारी अकेले साहेब ग्राम विस्तार अधिकारी हनुमंत झांबरे व दत्तात्रेय साळुंखे तसेच हनुमंत माने तात्यासाहेब देशमुख सर्व ग्रामपंचायत सदस्य तसेच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे लेझीम पथक राजर्षी शाहू विद्यालयातील विद्यार्थी सर्व शिक्षक व ग्रामस्थ उपस्थित होते
सर्व अधिकाऱ्यांना गौर हे गाव अभ्यास दौऱ्यासाठी निवडण्यास दत्तात्रय साळुंखे यांनी विशेष प्रयत्न केले

Post a Comment
0 Comments