Type Here to Get Search Results !

पाणी पुरवठा करा अन्यथा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढू

 पाणी पुरवठा करा अन्यथा ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढू


दहिफळ प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील दहिफळ येथील वार्ड क्रमांक ४ मध्ये

गेल्या दोन महिन्यापासुन नळाचे पाणी बंद आहे. ग्रामपंयातकडे वारंवार तोंडी तक्रारी दिल्या आहेत.अद्यापर्यंत कसलीच हालचाल झालेली नाही.

ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे दोन महिन्यापासुन पाणी पुरवठा नाही. दि.१९नोव्हेंबर रोजी ग्रामस्थांनी निवेदन दिले आहे.निवेदनात असे म्हटले आहे की, वार्ड क्रमांक चार मध्ये गेल्या दोन महिन्यापासुन पाणी पुरवठा बंद आहे.पाईप लाईन फुटलेली आहे. तत्काळ पाईप लाईन दुरूस्ती करावी.पाणी पुरवठा सुरळीत करावा.

गावचे ग्रामदैवत श्री खंडोबा यात्रा २६ तारखेला आहे.

२५ तारखे पर्यंत नळाला पाणी सोडा.पाणी नाही आले तर 

ऐन यात्रेच्या दिवशी दि.२६ तारखेला ग्रामपंचायतवर घागर मोर्चा काढण्याचा ईशारा दिला आहे.निवेदनावर              

प्रशांत भातलवंडे,राणी भातलवंडे,वैशाली भातलवंडे,रेश्मा भातलवंडे, अंजली कदम,दिलीप कदम,विकी 

हरणे,बापु हरणे,राजेंद्र पुरी,विश्वंभर पुरी सुदर्शन ढवळे,सुभाष ढवळे,जनक भातलवंडे,बालाजी भातलवंडे,

लिलावती ढवळे,विश्वनाथ मते,बालाजी ढवळे ,शहाजी ढवळे,अदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.


                                                       

Post a Comment

0 Comments