सोलापुर विभागाचे विभाग नियंत्रक गोंजारींनी येरमाळा बस स्थानकाची केली पाहणी
येरमाळा प्रतिनिधी-नितेश बारकुल
हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे स्वच्छ व सुंदर बस स्थानक स्वच्छता मोहिमे अंतर्गत रापकळम आगार बस स्थानक येरमाळा( वर्ग ब ) स्वच्छता स्थिती पाहणी सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक गोंजारी साहेब व सहकारी नेटके साहेब यांनी येरमाळा बस स्थानकास प्रत्यक्ष भेट देऊन येरमाळा बस स्थानकाची पाहणी केली.
यावेळी गोंजारी साहेब यांनी बस स्थानकाच्या स्वच्छते बाबत समाधान व्यक्त केले व महिला स्वच्छक श्रीमती गांधले यांचा सत्कार केला
यावेळी कळंब आगाराचे आगार प्रमुख सत्यशिल खताळ वाहतूक नियंत्रक नागटिळक साहेब, धाकतोडे साहेब हे देखील उपस्थित होते. तसेच येरमाळा गावातील नितीन बारकुल , दीपक आगलावे ,दळवी, बालाजी देशमुख अदी उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments