ज्ञानोद्योग विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघ अध्यक्षपदी समाधान बारकुल यांची निवड
येरमाळा ता. कळंब येथील ज्ञानोद्योग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाची स्थापना शासकीय परिपत्रकानुसार करण्यासाठी आज दि. 14 रोजी सकाळी अकरा वाजता विद्यालयात माजी विद्यार्थ्यांची प्राचार्य सुनील पाटील यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीस विविध स्तरात कार्यरत असलेले शाळेचे अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
बैठकीच्या प्रारंभी माजी विद्यार्थ्यांच्या संघटनेची आवश्यकता, उद्दिष्टे, शाळेशी सातत्यपूर्ण नाते कायम ठेवणे, सामाजिक व शैक्षणिक उपक्रमांची आखणी, तसेच विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन उपक्रम राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली. उपस्थितांनी आपली मते मांडत संघटना कार्यक्षम व पारदर्शक राहण्यासाठी योग्य पदनियुक्त्यांची गरज व्यक्त केली. तसेच यावेळी उपस्थित त्यांना माजी विद्यार्थी संघाची कार्य व गरज याबाबत सविस्तर मार्गदर्शक प्राचार्य सुनील पाटील, समाधान बेदरे, अमोल बारकुल, दत्ता बारकुल, बालाजी बारकुल, पेजगुडे सर, शिंदे सर, धनंजय बारकुल, तात्या डुकरे व इतर जणांनी आपले विचार मांडले तसेच सर्वांच्या सहमतीने झालेल्या निवडीमध्ये माजी विद्यार्थी संघ
अध्यक्षपदी समाधान बारकुल, उपाध्यक्षपदी लहू बारकुल,
कोषाध्यक्षपदी विकी वाघमारे,
सचिव पदसिद्ध प्राचार्य सुनील पाटील
अशाप्रकारे माजी विद्यार्थी संघाची स्थापना करून कार्यकारिणी निश्चित करण्यात आली. नव्याने नियुक्त पदाधिकाऱ्यांचा विद्यालय व्यवस्थापन व प्राचार्य, शिक्षकवर्गाच्या व उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी भक्कम साथ व शुभेच्छा देत शाळेच्या विकासासाठी, विद्यार्थी कल्याणासाठी आणि सामाजिक उपक्रमांच्या अंमलबजावणीसाठी सर्वांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन करण्यात आले.
ज्ञानोद्योग विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांची ही संघटना शाळेच्या प्रगतीत नवा टप्पा ठरेल, अशी अपेक्षा उपस्थित सर्वांच्या व्यक्त करण्यात आली. यावेळी सचिन बारकुल, देवानंद बारकुल, राहुल पाटील, माजिद शेख, मुन्ना मोरे, नदीम मुलानी, संदीप बारकुल, संतोष तौर, विकास जाधवर, सुखदेव गायके, तेजस बारकुल, मदन बारकुल, सोमनाथ बारकुल, विशाल बारकुल, विलास बारकुल, चांदणे सर व इतर उपस्थित होते.

Post a Comment
0 Comments