Type Here to Get Search Results !

दहिफळ येथे वारकरी साहित्य परिषदेचा १४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

 

दहिफळ येथे वारकरी साहित्य परिषदेचा १४ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा- 

कळंब तालुक्यातील दहिफळ येथे वारकरी साहित्य परिषद महाराष्ट्र राज्य १४ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

येथील महादेव मंदिरात भगवान भाऊ येडशीकर भजनी मंडळाच्या वतीने वर्धापन दिन साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणुन वारकरी साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष ह.भ.प श्रीहरी चौरे महाराज, तालुकाध्यक्ष बळीरामजी कवडे महाराज वारकरी साहित्य परिषदेच्या महिला जिल्हाध्यक्षा ह.भ.प सुनितादेवी आडसुळ महिला तालुकाध्यक्ष-खळदकर ताई,हभप चंदु महाराज मडके मोहा बाभळगाव एकनाथ पाटील हाळदगाव उमेश जावळे हभप संजय माने शिंगोली हभप शंकरराव कोरे धानोरा.वारकरी साहित्य परिषदेचे तालुका संपर्क प्रमुख अशोक भातलवंडेउपस्थीत होते.


कार्यक्रमाची सुरूवात दिपप्रज्वोलाने करण्यात आली.मान्यवरांचा सत्कार शाल श्रीफळ पुष्पहार घालुन सत्कार करण्यात आला.तसेच गावातील ९७ वर्षाचे केशव भातलवंडे यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

वयाच्या ९७ वर्षात ही भजन किर्तनाला उपस्थीत राहुन हरी जागर करतात.त्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी मान्यवरांनी विचार व्यक्त केले.  

जिल्हाध्यक्ष श्रीहरी चौरे महाराज यांनी वारकरी परिषदेच्या माध्यमातून वारकरी मंडळातील पकवाज वादक,टाळ वादक,विना वादक,हार्मोनियम वादक,गायक यांना शासनाकडुन दिला जाणारे कलाकार म्हणून दिले जाणारे  मानधन फाईल दाखल करून लाभ मिळवून दिला. साहित्य परिषदेच्या माध्यमातून वारकरी,टाळकरी,माळकरी यांना एकत्र जोडले.संघटनेच्या माध्यमातून वारकरी सांप्रदायासाठी कार्य करत असल्याचे सांगितले.यावेळी तालुकाध्यक्ष हभप बळीरामजी  कवडे,महिला जिल्हाध्यक्षा हभप सुनितादेवी आडसुळ यांनी मनोगत व्यक्त केले तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक भातलवंडे यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी भगवान भाऊ येडशीकर भजनी मंडळाचे अनंत हरणे,चंद्रकांत बोरके, हरिचंद्र भातलवंडे,अनिल धप्पाधुळे,वसंत किलचे सुरेश पाटील  यांनी परिश्रम घेतले. आशाबाई भातलवंडे, सुशाला ढवळे, सुवर्णा भातलवंडे,विजया मते ,पुष्पा भातलवंडे, कुसुम भातलवंडे,वैशाली भातलवंडे अदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

Post a Comment

0 Comments