धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा-
कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी गावचे ग्रामदैवत सटवाईदेवी नवसाला पावनारी देवी आहे.या देवीची मुख्य यात्रा वैशाख मौर्णिमेला भरते.परंतु देवीच्या दर्शनासाठी भाविक भक्त दररोज येतात.सटवाई देवस्थान जागृत असुन सटवाई देवीला मानणारा भक्तजन मोठा आहे.सटवाई देवीचे महात्म्य वेगळे आहे.मुल नवसा होवो किंवा न होवो.गावातील मुलगी सासरी गेले तरी मुलगा झाल्यावर मुलाचे जावळ देवी समोर काढण्याची प्रथा आहे.
गावातील असो वा बाहेर गावचे मुल सटवाई देवी समोर जावळ काढण्याची प्रथा जुनी आहे.तसेच देवीला बकऱ्याचा बळी दिला जातो.नैवद्य दाखवला जातो.
गुरूवार,सोमवार,एकादशीचा दिवस सोडला तर रोज बकरी
कापली जातात. जवळपास तीस ते चाळीस बकरऱ्यांचा बळी दिला जातो.पाहुणे राऊळे,मित्रमंडळी सटवाईच्या कार्यक्रमाला एकत्र येतात.सटवाई देवीचे मंदिर गावाजवळ असुन निसर्गरम्य वातावरणात वडांच्या गर्द झाडीत मंदिर आहे. दगडी बांधकाम असुन समोर सभामंडप आहे.
मंदिरासमोर एका बाजुला विहीर आहे. मंदिराच्या उजव्या बाजुला काही अंतरावर डिकमळ आहे.भक्तमंडळी साठी मंदिराच्या डाव्या बाजुला पत्र्याचे शेड मारलेले आहे.
वडाच्या झाडाखाली सावलीत भक्तांची एकच गर्दी झालेली दिसते. लहान मुलासाठी खेळण्याची दुकाने ,नारळ,फुलाचे दुकाने आहेत.देवीची मुख्य यात्रा चैत्र वैशाख पोर्णिमेला भरते. जिल्हाभरातील भाविक यात्रेला येतात.एकदातरी सटवाई करावी.सवासणी जेऊ घालाव्या अशी परंपरा आहे.
सटवाई देवीची सेवा पुजारी,बेदरे,आगलावे करतात.
सटवाई देवी जागृत देवस्थान आहे.तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तिर्थ विकास आराखडा तयार करून तिर्थ क्षेत्राचा दर्जा प्राप्त करून घेण्यासाठी ग्रामपंचायतने पुढाकार घ्यावा अशी ग्रामस्थातून मागणी होत आहे.

Post a Comment
0 Comments