Type Here to Get Search Results !

दहिफळ येथील राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वविना.......

 दहिफळ येथील राष्ट्रवादी पक्ष नेतृत्वविना.......

धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा-

कळंब तालुक्यातील दहिफळ गाव राजकीय पटलावर गाजलेलं गाव.गावात शेतकरी कामगार पक्ष,काॅंग्रेस पक्ष,राष्ट्रवादी पक्षाचा,शिवसेना पक्षाचा दबदबा होता.

  प्रत्येक निवडणुकीत प्रचाराचा जल्लोष असायचा.

शेकाप पक्षाचे स्व. माणिकराव पाटील,राष्ट्रवादीचे स्व.भाऊसाहेब पाटील, स्व.अप्पासाहेब भातलवंडे,

डि एस भातलवंडे ,काॅंग्रेसचे अशोक भातलवंडे,

शिवसेनेतून बाबासाहेब भातलवंडे,सुरेश भातलवंडे,

अशोक हावळे सुरेश मते यांनी राजकारणात 

एक पक्षाचा नेता कार्यकर्ता म्हणून गावाची वेगळी ओळख निर्माण केली होती.विधानसभा,लोकसभा,जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत पासुन ते  सोसायटी निवडणुकीत आपल्या पक्षाचे नेतृत्व सिध्द करण्यासाठी नेते जिवाचे रान उठवून पक्षाचा प्रचार करत असत. मतदारांना आकर्षीत करून मतांचा गठ्ठा उमेदवारांच्या पदरात टाकुन विजयाचा गुलाल उधळला जात असे.कुठली का निवडणुक लागेना दहिफळच्या निकालाकडे सगळ्यांचे लक्ष लागायचे.प्रत्येक निवडणुक प्रतिष्टेची असायची. गावातील व्यक्ती पंचायत समिती सदस्य,जिल्हा परिषद सदस्य म्हणून जावा यासाठी एके काळी सगळे एकत्र येऊन उमेदवार निवडणुन द्यायचे.जुने नेतृत्व गेले. काहींनी क्षेत्र बदलले व राजकीय नेतृत्व कमी झाले. एका पक्षाचा ठळक चेहरा नेतृत्व सध्या तरी शिवसेना पक्षाचे दिसते.

सामान्य व्यक्तींच्या अडीआडचणी सोडवण्यासाठी युवा नेतृत्व पुढे येण्यासाठी पक्षाने युवकांना संधी दिली पाहिजे.राष्ट्रवादी पक्षाचा दबदबा होता.पक्षाचे काम करणारे कार्यकर्ते होते. परंतु पक्षात फुट पडल्यापासुन नेता कोण कार्यकर्ता कोण हेच कळायला मार्ग नाही.ऐन निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी पक्षाच्या जिल्हाध्यक्षांनी राजीनामा दिला आहे.गावपातळीवर पक्षाला सक्षम नेतृत्व नाही.नेताच नाही तर कार्यकर्ता ही सभ्रमात आहे.नेमकं कुणाचं काम करायचं.होणाऱ्या निवडणुकीत नक्कीच परिणाम दिसणार आहे.

प्रतिक्रिया-

  गावात पक्षाला नेतत्व नाही असं म्हणता येणार नाही.

मी तालुका उपाध्यक्ष  पदावर कार्यकरणीवर आहे.  गावातील प्रत्येक निवडणुकीत आम्ही पक्षाचे काम करतो.होऊ घातलेल्या निवडणुकीत सक्रीय सहभागी आहे.पक्षाचे नेतृत्व म्हणुन कधी पक्षाचा बॅनरखाली कार्यक्रम घेतला नाही म्हणुन नेतृत्व नाही असं म्हणता येणार नाही.

प्रशांत भातलवंडे-राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट कळंब तालुका उपाध्यक्ष.






Post a Comment

0 Comments