धाराशिव स्टार न्युज वृत्तसेवा
गौर प्रतिनिधी-कळंब तालुक्यातील गौर गावात अवैध्य धंद्याला उत आला होता.विद्यामंदिराच्या भोवती दारुंच्या रिकाम्या बाटल्यांचा ढीग लागलेला होता.ग्रामपंचायतच्या वतीने पोलिस प्रशासनाला अनेक वेळा लेखी निवेदन दिले होते.परंतु संबंधीत व्यक्तीवर कार्यवाही झाली नाही.पोलिसांचा वरदहस्त असल्याची चर्चा गावात रंगत होती.गावातील तुकाराम ज्ञानोबा घाटुळे यांनी आमरण उपोषण करण्याचा निर्धार केला.शहिद हुतात्मा स्मारकात जाऊन शहिद विरांना अभिवादन करून दि.१३ डिसेंबर रोजी गौर ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली.कडाक्याच्या थंडीत उपोषण सुरु केले.गावातील महिलांनी या उपोषणाला पाठिंबा दिला.
गावात अवैध्य धंदे करणारे नामे दत्ता मोतीराम माळी व जयश्री काकासाहेब वाघमारे यांच्या विरूध्द तक्रारी होत्या.अखेर येरमाळा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलिस निरिक्षक टि.आर भालेराव यांनी भारतीय न्याय सुरक्षा संहिता २०२३ कलम १६८ नुसार प्राप्त झालेल्या माहिती नुसार संबंधीत व्यक्तीवर मौजे गौर व परिसर हद्दीत कुठे ही अवैध्य धंदा केल्याचे दिसुन आल्यास जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कार्यवाही करण्याची नोटीस बजावली आहे.नोटीस बजावलेली प्रत उपोषण करत्याला दिली व उपोषण सोडण्याची विनंती केली.पोलिस प्रशासनाच्या मध्यस्थीने तुकाराम ज्ञानोबा घाटुळे यांनी उपोषण मागे घेतले.यावेळी गावातील आबा देशमुख,अनिल देशमुख,अशोक पाटील,अमोल साखरे,बीट आमलदार सागर कांबळे,पोलिस कर्मचारी कमलाकर सुरवसे,पापा मुंडे,धनंजय देशमुख अदी ग्रामस्थ उपस्थीत होते.

Post a Comment
0 Comments