Type Here to Get Search Results !

सगळ्याच पक्षाने दहिफळकरांना नाकारले :उमेदवारी न दिल्याने दहिफळकर नाराज

 सगळ्याच पक्षाने दहिफळकरांना नाकारले :उमेदवारी न दिल्याने दहिफळकर नाराज




धाराशिव स्टार न्युज

संपादक - योगराज पांचाळ दहिफळकर.


कळंब तालुक्यातील दहिफळ गाव साडे चार हजार लोकसंख्या असलेले गाव.प्रत्येक निवडणुकीत महत्वाची भुमिका निभावणारे गाव शिवसेना पक्षाच्या बाजुनी लीड देणारे गाव म्हणुन या गावची ओळख आहे.परंतु शिवसेना पक्षाकडुन उमेदवारीका दिली नाही.असा प्रश्न उपस्थीत होत आहे.तसं राजकीय पाठीमागचा इतिहास पाहिला तर राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षाचा मोठा दबदबा असणारे गाव. राष्ट्रवादी पक्षाकडून जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुक लढवून  सदस्य, जि प सभापती, जि प  उपाध्यक्ष म्हणुन पदावर गावातील व्यक्ती गेली.नेहमीच राजकीय पटावर गावचा वर चाष्मा राहिला होता.पक्षाचे खंबीर नेतृत्व होते.अप्पासाहेब भातलवंडे,अशोक भातलवंडे,डि एस भातलवंडे,भाऊसाहेब पाटील,राजाभाऊ पाटील,माणिकराव पाटील.यांनी राजकारणात गावचा दबदबा कायम ठेवला.शेतकरी कामगार पक्षाकडुन पंचायत समिती सदस्य म्हणुन भिमराव पाटील निवडुण गेले होते.एकंदरीत जिल्ह्याच्या राजकारणात गावातील नेत्यांचा दबदबा होता.त्यामुळे कुठलीही निवडणुक असो दहिफळच्या उमेदवारांचा विचार केला जात होता.

जसे जुने नेते गेले तसे राजकीय नेतृत्व कमी झाले.गावपातळीवर अंतरर्गत कलह मतभेद वाढले व तालुका जिल्ह्याच्या राजकारणात गावाची किंमत कमी झाली.

ऐकेकाळी गावाच्या विकासासाठी सगळ्याच पक्षातील नेतेमंडळी एकत्र येत असत.निवडणुका पार पडल्या की मतभेद विसरून पुन्हा आपापल्या कामाला लागत असे.

आज राजकीय दृष्ट्या गावात राजकीय नेतृत्व करणारा नेताच राहिलेला नाही.निवडणुकी पुर्ते नेते कार्यकर्ते येतात अन् जातात.त्यामुळे कुठलाच पक्ष गावातील नेत्याला तालुका,जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचे स्थान देत नाही अशी परिस्थीती निर्माण झाली आहे.

यंदा जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी दहिफळचा उमेदवार कुठल्याच पक्षाने दिला नाही.अपक्ष उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत परंतु पक्षाने उमेदवारी का  दिली नाही याचे अत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.गाव अंतर्गत किती कलह असु द्या परंतु गावच्या विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन विचार करणे गरजेचे आहे.आज फक्त मतदार म्हणुन आपण निवडणुकीला सामोरे जाणार आहोत का.? 

जर असं झालं तर पुढची वाटचाल कशी असेल.

पक्ष कुठला का असेना त्यांनी उमेदवारी द्यायला पाहिजे होती असा प्रश्न दहिफळकर विचारत आहेत.

पक्षाने कुणालाच उमेदवारी दिली नसल्यामुळे नाराजाची सुर घूमत आहे.



Post a Comment

0 Comments