Type Here to Get Search Results !

दहिफळ येथील दारुबंदीचे निवेदन रद्द

 दहिफळ येथील दारुबंदीचे निवेदन रद्द

दारुबंदी लढा अयशस्वी.

दहिफळ प्रतिनिधी-कळंब तालुक्यातील दहिफळ येथील दारुबंदीचे निवेदन रद्द करण्यात आले आहे.

याबाबत माहिती अशी की,येथील महिलांनी दारुबंदीसाठी एल्गार पुकारला होता.ग्रामपंचायत कार्यालयात दारुबंदी करण्यासाठी अर्ज दाखल केला होता.दि.२९डिसेंबर २०२५रोजी जिल्हाधिकारी कार्यालय,राज्य उत्पादन शुल्क विभाग कार्यालय,जिल्हाअधिक्षक कार्यालयात शेकडो महिलांच्या उपस्थितीत महिलांच्या स्वाक्षऱ्या असलेले निवेदन देण्यात आले होते.दारुबंदीसाठी गावात महिलांनी जनजागृती केली.ग्रामपंचायत समोर विशेष महिलांची ग्रामसभा घेण्यात आली होती.राज्य उत्पादन शुल्क विभाग यांच्या वतीने २४९ महिलांची सही/अंगठ्याची पडताळणी करण्यात आली.निवेदनावर ३००च्यावर महिलांच्या सह्या होत्या.पडताळणी दरम्यान २४९ महिलांच्या सह्या ग्राह्य धरण्यात आल्या आहेत.दारुबंदीसाठी लोकसंख्येच्या २५ टक्के महिलांच्या सह्या असाव्या लागतात.मतदार यादी प्रमाणे १२०० महिला आहेत.त्यापैकी ३०० महिलांच्या सह्या असलेले निवेदन प्राप्त असले पाहिजे.दि२३फेब्रुवारी२०२६ रोजी सह्या/अंगठ्याची पडताळणी झाली.२४९ महिलांच्या अंगठा व सह्या तपासण्यात आल्या.महिला लोकसंख्येच्या मानाने २०.७५ टक्के महिलांची स्वाक्षरी आढळुन आली.शासनमान्य दारुबंदी करण्यासाठी २५ टक्के महिलांचे निवेदन न मिळाल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन दारुबंदीचे निवेदन रद्द करण्यात आल्याचे पत्रक काढले आहे.आदेशाच्या विरोधात अपिल करायचे असल्यास आदेशाच्या तारखेनुसार ९० दिवसाच्या आत मा.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क ,महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्याकडे अपिल करता येईल असे पत्रकात म्हटले आहे.

दहिफळच्या महिलांनी उभी केलेली चळवळ सध्यातरी आदेशामुळे थंडावली आहे.

दारुबंदीचा लढा अयशस्वी झाल्यामुळे समाजिक कार्यकर्ते बालाजी विश्वनाथ भातलवंडे यांनी मुंडन करून मिशा काढुन प्रशासनाचा  निषेध केला आहे.जो पर्यंत दारुबदी होत नाही तोपर्यंत मिशी ठेवणार नाही अशी शपथ घेतली आहे.



Post a Comment

0 Comments