विभागीय अध्यक्ष पदी दिलीप अंगरखे यांची निवड
कळंब प्रतिनिधी- राज्य परिवहन महामंडळ कळंब येथे कर्मचारी संघटनेची वार्षीक सर्वसाधारन सभा संपन्न झाली.यासभेत सर्वानुमते दहिफळ येथील दिलीप अंगरखे यांची कर्मचारी संघटनेच्या विभागयी अध्यक्ष पदी निवड करण्यात आली.शासकीय विश्रामगृह कळंब येथे कास्ट्राईब रा.प कर्मचारी संघटना यांचे वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष पदी अंगारखे बापु हे तर प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय प्रशासकीय पदी काम केलेले आहे अनुभवी आणि संघटनेचे माजी सचिव तथा मार्गदर्शक मा. संजय कदम साहेब हे लाभले होते.यावेळी कळंब आगारात 28 सभासद संख्येवरून सुमारे 100+ सभासद संख्या झाल्याबद्दल त्या सर्वांचे स्वागत मा. संजय कदम यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच इतर आगारातील नवनिर्वाचित सर्व पदाधिकाऱ्यांचे सत्कार या ठिकाणी करण्यात आले.भूम आगारातील कास्ट्राईब संघटनेच्या अध्यक्ष पदी श्री.सुनिल मोरे यांची तर सचिव पदी श्री.निलेश उपरे यांची निवड करण्यात आली.यावेळी विभागीय अध्यक्ष पदी कळंब येथील मा.दिलीप (बप्पा) अंगारखे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.विभागीय सचिव पदी मा.सचिन मोरे साहेब यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.विभागीय कार्याध्यक्ष पदी मा.प्रणव सिरसाटे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.विभागीय कोषाध्यक्ष पदी मा.बाबासाहेब धावारे यांची निवड सर्वानुमते करण्यात आली.यावेळी कळंब आगाराचे वाहक सुबोध रणदिवे यांनी आलेल्या सर्व पाहुण्यांचे आभार मानले.

Post a Comment
0 Comments