हत्या, प्रेमसंबंधातुन रचला कट - वयापेक्षा लहान मुलाबरोबर संबंध, नवऱ्याचा खुन, एक प्रेमी वाचला - मंगरूळ येथील घटना
धाराशिव -
अनैतिक प्रेमसंबंधातुन खुन केल्याची घटना उघडकीस आली असुन पोलिसांनी या प्रकरणी 3 जणांना अटक केली आहे. वयापेक्षा लहान मुलासोबत प्रेमसंबंध ठेवले व त्या प्रेम, अडसर यातुन या प्रेमाचा शेवट हत्या व त्यानंतर बेड्या असा झाला. मंगरूळ येथील हत्याकांड उघड करण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
तुळजापूर तालुक्यातील मंगरूळ येथे 36 वर्षीय कृष्णा आनंद साठे यांच्या हत्येने खळबळ उडाली होती, कोणतीही ठोस माहिती नसताना पोलिसांनी सर्व पुरावे गोळा करून 3 जणांना अटक केली. पोलीस अधीक्षक रितू खोकर, अपर पोलिस अधीक्षक शफकत आमना व उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ निलेश देशमुख, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे, स्थानिक गुन्हे शाखा सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय थोटे, पोलीस हवालदार महादेव राऊत व जी बी वागुलकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.
14 एप्रिल रोजी सायंकाळी 6 सुमारास 'गावात जाऊन येतो' असे सांगून घराबाहेर पडलेले कृष्णा साठे हे घरी आलेच नाहीत. शुभम मल्लिकार्जुन घाटोळे याने गोड बोलुन त्यांना दुचाकीवरून शेतात नेले. 'तुझी पत्नी मला आवडते, तू आमच्यात अडथळा आहेस, तू बाजुला सरक, मी तिझा व 2 मुलांचा सांभाळ करतो. कृष्णा यांनी नकार देताच लाकडाच्या ओंडक्याने डोक्यावर प्रहार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कृष्णाने जीव वाचवण्यासाठी व दवाखान्यात नेहण्याची आर्त विनंती केली परंतु आरोपीने कोणतीही दया दाखवली नाही उलट गुन्हा झाकण्यासाठी आरोपीने थंड डोक्याने पुढील डाव आखला.
मृतदेह शेतातील बैलांच्या कोठ्यात लपवून ठेवण्यात आला, नंतर तो पोत्यात भरून पार्थ देशमुख याला बोलावले व मृतदेह एका पुलाजवळ नेला तिथे 30 ते 40 मीटरपर्यंत फरपटत नेऊन टाकण्यात आले. आरोपीने मयताच्या पत्नीला “काम ओके झाले” असे सांगितले. घटनास्थळ, फॉरेन्सिक,श्वान पथक, सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीचा अचूक वापर करत पोलिसांनी गुन्ह्याची उकल केली.
मयताची पत्नी प्रतिभा कृष्णा साठे व आरोपी शुभम मल्लिकार्जुन घाटोळे यांचे गेल्या 5 ते 6 महिन्यापासुन प्रेमसंबंध होते. प्रतिभा हिच्या पेक्षा शुभम हा 5 वर्षांनी लहान होता मात्र प्रेमसंबंधात दोघे बुडून गेले होते, त्यातून हत्येचा कट रचून हत्या केली. 2 मुले, सुखी संसार असतानाही प्रेमाच्या भरात हे कृत्य केले गेले. प्रतिभा हिचे चारित्र्य वादग्रस्त राहिले, तीचे आणखी काही जुने प्रेम संबंध होते, त्यातील एक जण तिला दारू पिऊन त्रास द्यायचा, त्याला मारण्याचा शुभमचा कट होता मात्र तो सुदैवाने वाचला असे समोर आले.
तपासात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, पोलीस हवालदार बळीराम शिंदे व पोलीस हवालदार अमोल निंबाळकर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. धाराशिव पोलिसांनी अत्यंत शिताफिने या खुनाचा उलघडा केला.

Post a Comment
0 Comments